गणित, भौतिकशास्त्राला वगळण्याचा निर्णय चुकीचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:34 AM2021-03-19T04:34:02+5:302021-03-19T04:34:02+5:30
जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालये - ०७ एकूण जागा - ७००० या निर्णयाचा परिणाम बुलडाणा जिल्ह्यात अभियांत्रिकीचे शासकीय महाविद्यालय नाही तर ...
जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालये - ०७
एकूण जागा - ७०००
या निर्णयाचा परिणाम
बुलडाणा जिल्ह्यात अभियांत्रिकीचे शासकीय महाविद्यालय नाही तर खासगी महाविद्यालयांची संख्या सात आहे. दरवर्षी सुमारे सहा ते सात हजार जागांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविली जात असते. अजूनही विद्यार्थ्यांची अभियांत्रिकीला पसंती दिसून येते. बऱ्याच वेळा जिल्ह्यातील विद्यार्थी इतर जिल्ह्यांत शिक्षणासाठी जातात. जिल्ह्यात अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या कमी असल्याचे दिसून येते. दरम्यान, गणित व भौतिकशास्त्र वगळल्यास त्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवरसुद्धा परिणाम होऊ शकतो, असेही मत व्यक्त होत आहे.
चुकीचा निर्णय
अभियांत्रिकीसाठी गणित व भौतिकशास्त्र हे विषय महत्त्वाचे आहेत. गणित विषयाशिवाय अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण होऊच शकत नाही. म्हणून, इंजिनिअरिंगचा दर्जा घसरवायचा नसेल व मुलांना खोट्या आकर्षणाच्या सापळ्यात अडकवायचे नसेल तर भौतिकशास्त्र व गणित वगळू नये. तो निर्णय चुकीचा वाटतो. हा निर्णय संस्थाचालकांच्या दबावाखाली तर झाला नाही ना, अशी शंका एका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्याने उपस्थित केली.