ग्रामीण भागातील दुग्ध उत्पादनात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:24 AM2021-07-18T04:24:50+5:302021-07-18T04:24:50+5:30
मेहकरात कमी दाबाने वीजपुरवठा मेहकर : शहरातील काही भागात वीज गायब होण्याचे प्रकार वाढले आहेत. अनेक ठिकाणी कमी दाबाचा ...
मेहकरात कमी दाबाने वीजपुरवठा
मेहकर : शहरातील काही भागात वीज गायब होण्याचे प्रकार वाढले आहेत. अनेक ठिकाणी कमी दाबाचा वीजपुरवठा केला जात आहे. शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. पाऊस आणि वादळामुळे लगेच विद्युतपुरवठा खंडित होतो.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा तिढा सुटेना!
बुलडाणा : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत त्रुटी असलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना यंदाही पीक कर्जापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. कर्जमाफीचा तिढा सुटता सुटत नसल्याचे दिसून येत आहे. पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना बँकेत चकरा माराव्या लागत आहेत.
एसटी महामंडळाच्या कामगारांसमोर अडचणी
बुलडाणा : कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेली महाराष्ट्राची जीवनवाहिनी एस.टी. व त्यावर उपजीविका करणारे चालक, वाहक, कामगार व त्यांचे कुटुंब हलाखीचे जीवन जगत आहेत. कामगारांचे वेतन लांबणे नित्याचेच झाले आहे.
पेनटाकळी कालव्यातील पाझर थांबवा
मेहकर : तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्यातून पाझरणाऱ्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत काहीच ठोस उपाययोजना होणार नसेल तर त्या शेतकऱ्यांच्या जमिनी समृद्धी महामार्गाच्या भावाने विकत घेऊन तत्काळ मोबदला द्यावा, अशी मागणी आ. संजय रायमुलकर यांनी पेनटाकळी प्रकल्प अधिकाऱ्यांच्या बैठकीत केली आहे.
केळवद येथे ‘विकेल ते पिकेल’बाबत मार्गदर्शन
चिखली : तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत तालुक्यातील केवळद येथे मिरची, तर खंडाळा म. येथे हळद या पिकाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. विकेल ते पिकेल अंतर्गत केळवद येथे मिरची पिकाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.