जाहीर केलेली नुकसानभरपाई तुटपुंजी - रविकांत तुपकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 01:07 AM2018-02-18T01:07:38+5:302018-02-18T01:08:05+5:30

खामगाव: गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या नुकसानाची भरपाई म्हणून सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असून, आम्हाला ती मान्य नाही. गहू, हरभरा, कांदा उत्पादक शेतकर्‍यांना हेक्टरी किमान ५0 हजार रुपये, तर फळबागांना हेक्टरी १ लाख रुपये आर्थिक मदत द्या अन्यथा गारपीटग्रस्तांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला.

Declined losses declared - Ravi Kant Tupkar | जाहीर केलेली नुकसानभरपाई तुटपुंजी - रविकांत तुपकर

जाहीर केलेली नुकसानभरपाई तुटपुंजी - रविकांत तुपकर

Next
ठळक मुद्देगहू,हरभरा, कांदा पिकाला हेक्टरी ५0 हजार रुपये मदतीची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या नुकसानाची भरपाई म्हणून सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असून, आम्हाला ती मान्य नाही. गहू, हरभरा, कांदा उत्पादक शेतकर्‍यांना हेक्टरी किमान ५0 हजार रुपये, तर फळबागांना हेक्टरी १ लाख रुपये आर्थिक मदत द्या अन्यथा गारपीटग्रस्तांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला.
गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना नुकसान भरपाईचा योग्य मोबदला द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात संग्रामपूर पंचायत समितीवर भव्य मोर्चा शनिवारी दुपारी काढला. यावेळी ते बोलत होते.  रविकांत तुपकर यांनी बैलगाडी मोर्चाचे नेतृत्व केले. यापुढे सरकारच्या चुकीच्या धोरणावर तुपकर यांनी कडाडून टीका केली. एकीकडे माल्ल्या हजारो कोटींचा डल्ला मारून परदेशात पळून गेला. 
आता नीरव मोदीने आमच्या बँकावर डाका टाकून तोही फरार झाला. शेतकरी मात्र हजार-दोन हजार रुपयांच्या मदतीसाठी सरकारपुढे हात पसरवत आहे. काय चाललंय या देशात, ‘सब का साथ, सबका विकास’ म्हणणार्‍या मोदीने कोणाचा विकास केला? असा सवाल उपस्थित करून देश विकायला काढणार्‍या या सरकारला आता घरी पाठविण्यासाठी शेतकर्‍यांनो सज्ज व्हा, असे आवाहन तुपकर यांनी केले.      बोंडअळीच्या अनुदानाचे काय झाले? सोयाबीनने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले. आता पुन्हा नैसर्गिक आपत्तीने शेतकरी कोलमडून पडला. 
गारपिटीने शेतकर्‍यांचा गहू, हरभरा, कांदा, द्राक्ष ही पिके उद्ध्वस्त झाली. त्यामुळे या अस्मानी आणि सुलतानी संकटात शेतकरी सापडला असताना त्याला मदतीचा हात देण्याऐवजी सरकार आता वीमा कंपन्यांकडे बोट दाखवत आहे. अनेक शेतकर्‍यांना विमा भरता आला नाही. मग अशा शेतकर्‍यांना तुम्ही वार्‍यावर सोडणार काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 
दुसरीकडे नुकसानग्रस्तांचे पंचनामे करताना प्रशासन दुजाभाव करीत आहे. गावपुढारी पटवार्‍यांना हाताशी धरून आपल्या जवळच्या लोकांचे पंचनामे करून घेत आहे. त्यामुळे सामान्य शेतकर्‍यांवर अन्याय होत आहे. ही हुकूमशाही वेळीच बंद न झाल्यास व सर्वांना समान न्याय न मिळाल्यास अधिकार्‍यांना झोडपून काढा, असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला.  
या मोर्चामध्ये स्वाभिमानी जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर, मोहन पाटील, उज्ज्वल चोपडे, रोषण देशमुख, संतोष दाने, विलास तराळे,  ज्ञानेश्‍वर हागे सहभागी झाले होते. 

तोंड पाहून पंचनामे करू नका!
शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करा, तोंड पाहून पंचनामे करणे बंद करा व ज्यांचे खरेच नुकसान झाले त्यांना मदत द्या अन्यथा शेतकरी हातात रुम्हणे घेऊन ठोकून काढतील, असा सूचक इशाराही तुपकर यांनी दिला.

 

Web Title: Declined losses declared - Ravi Kant Tupkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.