जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र ठरले शोभेचे!

By Admin | Published: March 16, 2017 03:16 AM2017-03-16T03:16:01+5:302017-03-16T03:16:01+5:30

वैद्यकीय अधिकारी परतले नाही; आरोग्य प्रशासनकाडून अंधाची अवहेलना.

Decorated with the District Disability Rehabilitation Center! | जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र ठरले शोभेचे!

जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र ठरले शोभेचे!

googlenewsNext

बुलडाणा, दि. १५- जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यावतीने अपंग बोर्ड समिती स्थापन करण्यात आली. येथील जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्रात वैद्यकिय अधिकार्‍यांच्या अनुपस्थितीमुळे अपंगाना तपासणी न करताच परत जावे लागत असल्याचा प्रकार आज जिल्हा सामान्य रुग्णालयातली केंद्रात उघडकीस आला.त्यामुळे या अपंग व अंधाना शासकीय सवलतीपासून वंचित राहण्याची वेळ आली. युथ वेल्फेअर असोसिएशन ऑफ इंडिया यांच्याकडून जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात अपंग पुनर्वसन केंद्रात चालविले जाते. प्रत्येक महिण्याच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या बुधवारी अपंग बोर्डच्यावतीने येथे अपंगाची तपासणी करून त्यांना अपंग असल्याचे निश्‍चित करुन त्यांना अपंगाचे प्रमाणपत्र देण्यात येते. आज १५ मार्च रोजी अंध व अल्पदृष्टी असलेल्या नागरिकांची बोर्डाचे आयोजन करण्यात आले होते. तेथे तपासणी करुन अंध व अपंग प्रमाणपत्र मिळावे या उद्देशाने खामगाव, देऊळगावराजा, सिंदखेडराजा, बुलडाणा व ग्रामीण परिसरातील असे जिल्हाभरातून आलेल्या अंध व अल्पदृष्टी नागरिकांनी सकाळी ११ वाजतापासून अपंग पुनर्वसन केंद्राच्या परिसरात गर्दी असते. तपासणीची वेळी सकाळी ११ ते ३ वाजेपर्यत असतांना तपासणी करणारे वैद्यकीय अधिकारी दुपारी १२ वाजेपर्यत आले नाही. त्यानंतर दुपारी १ वाजता आलेला वैद्यकिय अधिकार्‍याने काही वेळातच नोंद करते. पुन्हा केंद्र खोलीला कुलूप लावूनलंचब्रेकच्या उद्देशाने पलायन केले. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी सांयकाळी ५ वाजेपर्यत ही परतलेच नाही. त्यामुळे सर्व अंध व अल्पदृष्टी महिला पुरुषांना तपासणी व नोंदणी न करताच परतावे लागले. या प्रकारामुळे अपंग पुनवर्सन केंद्रांचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

Web Title: Decorated with the District Disability Rehabilitation Center!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.