कृउबासमध्ये धान्यमाल घेऊन येणा-यांच्या संख्येत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 07:40 PM2017-10-05T19:40:23+5:302017-10-05T19:49:46+5:30

लोणार : यावर्षी दुष्काळजन्य परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्य घेऊन येणाºयांची संख्या घटली. अपेक्षेप्रमाणे धान्याला भावही नसल्यामुळे शेतकºयांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्य आणण्यास पाठ फिरवली आहे. याचा परिणाम बाजार समितीच्या उत्पन्नावरही झाला आहे. 

Decrease in the number of commuters brought by cremation in Corbus | कृउबासमध्ये धान्यमाल घेऊन येणा-यांच्या संख्येत घट

कृउबासमध्ये धान्यमाल घेऊन येणा-यांच्या संख्येत घट

Next
ठळक मुद्देदुष्काळजन्य परिस्थितीमुळे यावर्षी पिकांचे नुकसानअपेक्षेप्रमाणे धान्याला भावही नसल्यामुळे शेतक-यांनी फिरवली पाठ 

किशोर मापारी
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार : यावर्षी दुष्काळजन्य परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्य घेऊन येणाºयांची संख्या घटली. अपेक्षेप्रमाणे धान्याला भावही नसल्यामुळे शेतकºयांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्य आणण्यास पाठ फिरवली आहे. याचा परिणाम बाजार समितीच्या उत्पन्नावरही झाला आहे. 
मागील चार वर्षांपासून तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. उसनवारीच्या पैशावर शेतकºयांनी बि-बियाणे खरेदी करून पेरण्या केल्या. मात्र, शेतकºयांना अपेक्षेप्रमाणे उत्पन्न मिळाले नाही. खरीपासह रबी पिकांनीही दगा दिल्याने शेतकºयांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. 
सध्या लोणार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला २५५० ते २८५० रुपये भाव आहे. पेरणी व मजुरीचा खर्च हि निघत नसल्याने शेतकºयांनी धान्य साठवून ठेवले असून काही ठिकाणी मजूर मिळत नसल्याने सोयाबीन मजुराच्या प्रतीक्षेत शेतात उभी आहे. यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसात शेतकºयाच्या हातात पैसे नसल्यामुळे दिन दीन दिवाळी असे म्हणण्याची वेळ आली आहे. 
पावसाअभावी सोयाबीनच्या शेंगातील दाणे भरलेच नाही. ज्वारीसारख्या सोयाबीनचा दाणा राहिल्याने उत्पन्नात प्रचंड घट झाली आहे. यावर्षी चांगल्या प्रतीच्या जमिनीत एक ते दोन पोते तर काहींना ४० ते ५०  किलो उत्पादन होत आहे. यामुळे बºयाच शेतकºयांनी शेतातून सोयाबीन काढण्यासही उत्साह दाखविला नाही.

गतवर्षी सात हजार यावर्षी केवळ दोन हजार क्विंटल आवक
यावर्षीच्या खरीप हंगामात निसर्ग शेतकºयावर कोपला असून, पावसाने ऐनवेळी दांडी मारल्याने शेतमाल उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. याचा थेट परिणाम बाजार समित्यांमध्ये होणाºया उलाढालीवर झाला आहे. गतवर्षी आॅक्टोबर महिन्यात ७ हजार क्विंटलपेक्षा जास्त सोयाबीनची आवक होती. मात्र यंदा केवळ २ हजार क्विंटलची आवक असल्याने सोयाबीनची आवक कमी झाल्याचे दिसून आले आहे.

Web Title: Decrease in the number of commuters brought by cremation in Corbus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.