कोरोना संसर्गात घट, मात्र मृत्यू चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:25 AM2021-06-05T04:25:20+5:302021-06-05T04:25:20+5:30

गेल्यावर्षी डिसेंबर अखेरपर्यंतच्या सात महिन्यात जिल्ह्यात १३ हजार ६२८ जण कोरोना बाधित झाले होते तर कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ...

Decreased corona infection, but worrying about death | कोरोना संसर्गात घट, मात्र मृत्यू चिंताजनक

कोरोना संसर्गात घट, मात्र मृत्यू चिंताजनक

Next

गेल्यावर्षी डिसेंबर अखेरपर्यंतच्या सात महिन्यात जिल्ह्यात १३ हजार ६२८ जण कोरोना बाधित झाले होते तर कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या १२ हजार ८८४ होती. गेल्या वर्षी जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या एकूण मृत्यूच्या तुलनेत ३६ टक्के मृत्यू हे सात महिन्यात झाले होते. त्याच्या जवळपास तब्बल ३२ टक्के मृत्यू हे एकट्या मे महिन्यात झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्याचा मृत्यूदर हा वाढत असल्याचे एकंदरीत चित्र आहे.

दुसरीकडे २०२१ या वर्षात कोरोनाचा प्रादुर्भाव हा सातत्याने वाढला. मे महिन्यात एप्रिलच्या तुलनेने कमी कोरोना बाधित आढळून आले. मात्र कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वाढले असले तरी कोरोना संसर्ग कमी झाला. जून महिन्यात तो आणखी झपाट्याने कमी होत आहे.

--२०२१ मधील कोरोनाचे संक्रमण--

जानेवारी

पॉझिटिव्ह रुग्ण:- १४५५

मृत्यू:- १८

फेब्रुवारी

पॉझिटिव्ह:- ४,६९५

मृत्यू:- २४

मार्च

पॉझिटिव्ह:- १९,०७६

मृत्यू:- ६७

एप्रिल

पॉझिटिव्ह:- २६,१४५

मृत्यू:- १५०

मे

पॉझिटिव्ह:- १९७९९

मृत्यू:- १९५

--रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले--

गेल्या वर्षीच्या तुलनेत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चालू वर्षात तीन टक्क्यांनी वाढले असून ते ९८ टक्क्यांवर पोहोचले आहे, ही समाधानाची बाब म्हणावी लागले. गेल्या वर्षी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के होते. त्यामुळे आता जून महिन्यात कोरोना संसर्गाचा ग्राफ आणखी कमी होण्याचे संकेत आहेत. मात्र गेल्या चार दिवसात २० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे वाढते मृत्यूचे प्रमाण हे सध्या घातक ठरत आहे. गेल्या वर्षी जिल्ह्याचा मृत्यूदर हा १.५९ टक्के होता. तो यावर्षी ०.७२ टक्के आहे. मात्र बाधितांची संख्या झपाट्याने वाढल्याने तो कमी दिसतो.

Web Title: Decreased corona infection, but worrying about death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.