शिंगणे यांच्या हस्ते रूग्णवाहिकेचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:23 AM2021-06-11T04:23:55+5:302021-06-11T04:23:55+5:30
लक्ष्मीनारायण ट्रस्ट द्वारे मेडिकेटेड बँक, ऑक्सिजन मशीन, अत्याधुनिक शवपेटी, स्वर्गरथ, शैक्षणिक साहित्य बँक, कपडा बँक आदी उपक्रमांच्या माध्यमातून अनेक ...
लक्ष्मीनारायण ट्रस्ट द्वारे मेडिकेटेड बँक, ऑक्सिजन मशीन, अत्याधुनिक शवपेटी, स्वर्गरथ, शैक्षणिक साहित्य बँक, कपडा बँक आदी उपक्रमांच्या माध्यमातून अनेक रूग्णांना सेवा दिली आहे. यामध्ये आता वैद्यकीय सहायता उपकरण केंद्र व रूग्णवाहिका सेवेची भर पडली आहे. या सेवेच्या लोकार्पण प्रसंगी ना. डॉ. शिंगणे यांनी संस्थेच्या सेवाभावी उपक्रमांचे कौतुक करून सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही दिली. यावेळी आ. श्वेता महाले, संजय गायकवाड, माजी आ. राहुल बोंद्रे, रेखाताई खेडेकर, नगराध्यक्षा प्रिया कुणाल बोंद्रे, जि. प. सदस्या डॉ. ज्योती खेडेकर, चिखली अर्बनचे अध्यक्ष सतीश गुप्ता, नगरसेवक डॉ. प्रकाश शिंगणे, अजयकुमार कोठारी, ट्रस्टच्या अध्यक्ष जयश्री चांडक व राजेश चांडक उपस्थित होते. प्रास्ताविक ट्रस्टचे सचिव डॉ. रजत चांडक, सूत्रसंचालन जयंत शर्मा तर आभार विनोद नागवाणी यांनी मानले.