भागवत कथेच्या निधीचे अयोध्येत समर्पण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2021 03:56 PM2021-02-04T15:56:41+5:302021-02-04T15:56:56+5:30

Khamgaon News प्रभु श्रीरामाचरणी निधी समर्पणासाठी प.पू. शंकरजी महाराजांनी नुकतीच अयोध्या यात्रा केली.

Dedication of Bhagwat story fund in Ayodhya! | भागवत कथेच्या निधीचे अयोध्येत समर्पण!

भागवत कथेच्या निधीचे अयोध्येत समर्पण!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: खामगाव तालुक्यातील शेलोडी येथील जागृती आश्रमाचे मठाधिपती प.पू. शंकरजी महाराजांनी अयोध्या येथील श्रीराम मंदिर निर्माणासाठी भागवत कथेतून प्राप्त झालेल्या निधीचे समर्पण केले.  प्रभु श्रीरामाचरणी निधी समर्पणासाठी प.पू. शंकरजी महाराजांनी नुकतीच अयोध्या यात्रा केली.

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासासाठी भारतभर निधी समर्पण अभियान राबविण्यात येत आहे. समाजातील विविध घटनांकडून निधी समर्पण केले जात असतानाच नापासांच्या आयुष्यात सकारात्मक विचारांची प्रेरणी करणारे खामगाव येथील जागृती आणि तपोवन आश्रमाचे मठाधिपती प.पू. शंकरजी महाराजांनी भागवत कथेतून आलेल्या निधीचे समर्पण केले. यासाठी प.पू. शंकर महाराजांनी नुकतीच अयोध्या यात्रा केली. या यात्रेदरम्यान श्रीराम लल्ला आणि हनुमान गढी येथील हनुमतांसह श्रीराम मंदिर निर्माणासाठी तयार करण्यात केलेल्या नक्षीदार शिलांचेही दर्शन त्यांनी यावेळी घेतले. भागवत कथेचे मानधन आणि कथेदरम्यान महाराजांना अर्पण करण्यात आलेल्या निधीचे महाराजांनी श्रीरामाचरणी समर्पण केले. प.पू. शंकर महाराजांचा हा संकल्प इतरांसाठी प्रेरणादायी असाच ठरत आहे.

 
विश्व कल्याणासाठी अयोध्येत प्रार्थना
-अयोध्या यात्रेदरम्यान प.पू. शंकर महाराजांनी विश्व कल्याणासाठी विशेष प्रार्थना केली. संपूर्ण जगाची कोरोना विषाणू संसर्गातून सुटकेसाठी विष्णू सहस्त्रनामाचे पठणही केले. तसेच श्रीरामाचरणी १००७ श्रीरामनाम जप यज्ञ समर्पित केला.

Web Title: Dedication of Bhagwat story fund in Ayodhya!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.