ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीनचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:37 AM2021-05-25T04:37:56+5:302021-05-25T04:37:56+5:30
चिखली शहरासाठी तीन मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याचा उपयोग गरजू रुग्णांना व्हावा या अनुषंगाने राष्ट्रीय स्वयंसेवक ...
चिखली शहरासाठी तीन मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याचा उपयोग गरजू रुग्णांना व्हावा या अनुषंगाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व जिजामाता राष्ट्रीय संस्कार प्रतिष्ठानच्यावतीने या मशीनचे रविवारी सकाळी लोकार्पण करण्यात आले. यावेळी प्रल्हाद जोशी रा. स्व. संघ चिखली नगरतर्फे सुरू असलेला उपक्रम व सेवा कार्याची माहिती दिली. नगर संघचालक शरद भाला यांच्या हस्ते या मशीनचे लोकार्पण करण्यात आले. या सेवा उपक्रमामुळे रुग्णांना मोठा आधार मिळणार असल्याने समाजातील दानशूरांनी पुढे येऊन या कार्यास हातभार लावावा, असे आवाहन भाला यांनी यावेळी केले. प्रसंगी जिल्हा कार्यवाहक राहुल निमावत, विभाग सहप्रचारक वैष्णव राऊत, प्रेमराज भाला, सुनील लाहोटी, गोविंद कुळकर्णी, विवेक महाजन, डॉ. राहुल जोशी, डॉ. भूषण डागा, पत्रकार पवनकुमार लढ्ढा, जिजामाता राष्ट्रीय संस्कार प्रतिष्ठानचे सदस्य व रा. स्व. संघ सेवा विभाग चिखलीचे कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, गरजूंनी या मशीनसाठी सुनील लाहोटी, गोविंद कुळकर्णी, स्वप्निल लव्हाळे, उमेश जपे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.