किनगाव जट्टू येथे तीव्र पाणीटंचाई; हंडाभर पाण्यासाठी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 01:54 PM2018-03-05T13:54:28+5:302018-03-05T13:54:28+5:30

Deep water shortage at Kingaon Jattu | किनगाव जट्टू येथे तीव्र पाणीटंचाई; हंडाभर पाण्यासाठी पायपीट

किनगाव जट्टू येथे तीव्र पाणीटंचाई; हंडाभर पाण्यासाठी पायपीट

Next
ठळक मुद्देयेथील ग्रामस्थांना महाजल योजनेच्या विहिरीतून पाणीपुरवठा करण्यात येत होता.विहिरीची पाण्याची पातळी खोल गेल्याने ती योजना बंद पडली असल्याने त्या विहिरीतून ग्रामस्थांना उन्हात पाणी काढावे लागत आहे. २५० रुपये खर्च करुन एक हजार लिटर पाणी विकत घेतात.

किनगाव जट्टू : यावर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामस्थांना हंडाभर पाण्याकरीता पायपीट करावी लागत असल्याने त्वरीत उपाययोजना कराव्या अशी मागणी होत आहे.
येथील ग्रामस्थांना महाजल योजनेच्या विहिरीतून पाणीपुरवठा करण्यात येत होता. परंतु यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने पाण्याची भूजल पातळी झपाट्याने खोल गेली. त्यामुळे आवठड्यातून एक दिवस पाणी येते ते सुद्धा नेहमी अर्ध्या भागात ते सुद्धा पुरेसे नसते. नदीतील पूरक पाणी पुरवठ्याच्या विहिरीची पाण्याची पातळी खोल गेल्याने ती योजना बंद पडली असल्याने त्या विहिरीतून ग्रामस्थांना उन्हात पाणी काढावे लागत आहे. रस्ता चढउताराचा असल्याने महिलांना डोक्यावर पाणी भरणे अवघड झाले आहे. काही हातपंप पाण्याअभावी शोभेचे ठरत आहेत. गावातील अर्ध्या भागातील नागरिकांना नेहमी नदीकाठावरील हातपंपाचे पाणी पिण्यासाठी आणावे लागते. परंतु त्याचे पाणीसुद्धा कमी झाल्याने रात्रंदिवस जागरण करुन थांबून पाणी हापसावे लागत आहे. मारोती मंदिराजवळील विहीर कोरडी पडली आहे. येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने काही नागरिक गाडीबैलावर ड्रम टाकून शेतातून पाणी आणतात. तर काही मोटारसायकलला कॅन लावून तर गोरगरीब जनतेला मिळेल तेथून विहिरीतून डोक्यावर पाणी आणावे लागते. काही २५० रुपये खर्च करुन एक हजार लिटर पाणी विकत घेतात. परिसरात अत्यल्प पाऊस झाल्याने दोन महिन्यापूर्वी नदीनाले कोरडे पडले. त्यामुळे जी पाणीटंचाई एप्रिल-मे महिन्यात निर्माण होणार होती ती मार्च महिन्याच्या पुर्वसंध्याला निर्माण झाली आहे. चोरपांग्रा धरणाजवळील जुनी नळ योजना सुद्धा नियोजनाअभावी जवळपाास १० ते १५ वर्षापासून बंद पडली आहे. थोड्याफार प्रमाणात तात्पुरती पाणीटंचाई दूर करण्यासाठी नदीतील विहिरीतील पाणी मारोती मंदिराजवळील विहिरीत सोडून १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून त्याच विहिरीत आडवे बोअर घ्यावे व पिण्याच्या पाण्याकरीता ग्रामपंचायत जवळील बोरवेलजवळ सिमेंटची टाकी बांधून तोट्या लावून पाणीवाटप केल्यास व शांतीलाल सोनी यांचे घराजवळील विहीर पाणी सोडल्यास पाणीटंचाई दूर करण्यास मदत होईल अशी मागणी होत आहे.
 
किनगाव जट्टू येथे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विहीर अधिग्रहण प्रस्ताव पाठविला असून पूरक पाणी पुरवठ्याच्या विहिरीतील पाणी मारोती मंदीराजवळील विहिरीत लवकरच सोडण्यात येवून पिण्याच्या पाण्याकरीता ग्रामपंचायत जवळील बोरवेलजवळ सिमेंट टाकी बांधून तोट्या लावण्यात येतील.
- ए.के.नवले, ग्रामविकास अधिकारी ग्रा.पं. किनगाव जट्टू, ता.लोणार.

Web Title: Deep water shortage at Kingaon Jattu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.