शिवसैनिकांनी घातला खुर्चीला हार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 12:46 AM2017-09-08T00:46:53+5:302017-09-08T00:48:20+5:30
मलकापूर नगर परिषद प्रशासनातील अधिकारी नेहमी गैरहजर राहत असल्याने नागरिकांना आपल्या कामासाठी नगरपालिकेत वेळोवेळी चकरा माराव्या लागत आहे. ही बाब नागरिकांनी शिवसेना शहर प्रमुख किशोर नवले यांच्या कानावर घातली असता त्यांनी व शिवसैनिकांनी ६ सप्टेंबर रोजी बांधकाम विभाग नगर अभियंता यांचे कार्यालय गाठले असता तेथे ते हजर नव्हते. त्यामुळे रिकाम्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर: मलकापूर नगर परिषद प्रशासनातील अधिकारी नेहमी गैरहजर राहत असल्याने नागरिकांना आपल्या कामासाठी नगरपालिकेत वेळोवेळी चकरा माराव्या लागत आहे. ही बाब नागरिकांनी शिवसेना शहर प्रमुख किशोर नवले यांच्या कानावर घातली असता त्यांनी व शिवसैनिकांनी ६ सप्टेंबर रोजी बांधकाम विभाग नगर अभियंता यांचे कार्यालय गाठले असता तेथे ते हजर नव्हते. त्यामुळे रिकाम्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी करण्यात आली.
मलकापूर नगर परिषद प्रशासनातील अधिकारी हे आ पल्या कामकाजाच्या वेळी गैरहजर राहतात. त्याचप्रमाणे महिन्यातून बरेच दिवस सुटीचा अर्जही न टाकता कार्यालयातून गायब राहतात. त्याचप्रमाणे काही अधिकारी हे सकाळी मस्टरवर सही मारून निघून जाता त. त्यामुळे आपली कामे करण्यासाठी नगर पालिकेत आलेल्या नागरिकांना त्यांची भेट घ्यावयाची असल्यास ते भेटतच नाही. एकीकडे नगरपालिका प्रशासन नागरिकांना कर भरावयाची सक्ती करत आहे तर दुसरीकडे नागरिक आपले कर भरावयास गेले असता त्या ठिकाणी कर्मचारी असो वा अधिकारी हे उपस्थित नसल्याने त्यांना आल्या पावली परतावे लागत आहे. त्यामुळे अशावेळी नगर परिषदेकडील असलेली कामे नागरिकांनी करावी तरी कशी, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या सर्व बाबीला कंटाळून नगर परिषद प्रशासनाकडून नागरिकांची कामे होत नसल्याने नागरिकांनी शिवसेना शहर प्रमुख किशोर नवले यांच्याकडे आपली कैफीयत मांडली असता ते नगर परिषद बांधकाम विभागाचे नगर अभियंता नंदकिशोर येवतकर यांची भेट घेण्यासाठी गेले. मात्र तेसुद्धा कार्यालयात हजर नव्हते. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी त्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून आपला रोष व्यक्त केला. यावेळी मुकेश लालवाणी, राजेश फुलोरकर, उमेश हिरुळकर, गोपीचंद वाधवाणी यासह नागरिक व शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.