भाजपमुळेच अमरावतीत पराभव, शिंदेंच्या आमदाराने फोडले खापर; सांगितलं काय घडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 04:46 PM2023-02-03T16:46:22+5:302023-02-03T16:54:17+5:30

अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीदरम्यान भाजप उमेदवार रणजीत पाटील आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही.

Defeat in Amravati because of BJP, Shinde's MLA Sanjay Gaikwad breaks down; Told what happened | भाजपमुळेच अमरावतीत पराभव, शिंदेंच्या आमदाराने फोडले खापर; सांगितलं काय घडलं

भाजपमुळेच अमरावतीत पराभव, शिंदेंच्या आमदाराने फोडले खापर; सांगितलं काय घडलं

googlenewsNext

बुलडाणा - विधान परिषदेच्या ५ जागांसाठी निवडणुका पार पडल्या. या निकालात महाविकास आघाडीनं भाजपाला जोरदार धक्का दिला. कोकण शिक्षक मतदारसंघ वगळता भाजपाला अन्य २ ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यात प्रामुख्याने नागपूर शिक्षक मतदारसंघ आणि अमरावती पदवीधर मतदारसंघात भाजपा उमेदवार पराभूत झाले आहेत. या निकालात अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जिंकणारे धीरज लिंगाडे हे जायंट किलर ठरलेत. त्यांनी माजी गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांचा पराभव केला. या पराभवानंतर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी भाजपवर पराभवाचे खापर फोडले आहे.  

अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीदरम्यान भाजप उमेदवार रणजीत पाटील आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही. कोणत्याही प्रचाराला आम्ही जाऊ शकलो नाही. मतदार याद्या आम्हाला केवळ चार दिवसाआधी मिळाल्या, असा गौप्यस्फोटच शिंदे गटाचे नेते आणि बुलडाण्यातील आमदार संजय गायकवाड यांनी केला. तसेच, शिक्षक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत जो काही चमत्कार करायची संधी होती, ती करायला मिळाली नाही. गावा-गावांमध्ये, तालुक्यामध्ये जी टीम पाहिजे होती ती आमच्या सोबत नव्हती. त्यामुळेच रणजीत पाटील यांचा पराभव झाला आहे. आम्हाला विश्वासात घेतले असते तर रणजीत पाटील यांचा विजय झाला असता असा विश्वासही संजय गायकवाड यांनी बोलून दाखवला.

धीरज लिगाडे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये 

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असलेले धीरज लिंगाडे यांना ऐन निवडणुकीत काँग्रेस पक्षात प्रवेश देत अमरावतीचं तिकीट दिलं. धीरज लिंगाडे हे ठाकरे गटाचे नेते होते. बुलढाणा खासदार प्रतापराव जाधव हे शिंदे गटासोबत गेल्यानंतर अनेकांनी पक्ष सोडला. परंतु धीरज लिंगाडे हे उद्धव ठाकरेंसोबत कायम राहिले. धीरज लिंगाडे हे आधीपासून पदवीधर मतदारसंघात निवडणूक लढण्याची तयारी करत होते. या मतदारसंघासाठी शिवसेनेने दीड वर्ष आधीच तयारी सुरू केली होती. मात्र, अमरावतीची जागा काँग्रेसकडे असल्याने महाविकास आघाडीत या जागेसाठी काँग्रेसनं आग्रह कायम ठेवला. त्यामुळे धीरज लिंगाडे यांनी ठाकरेंना रामराम करत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 
 

Web Title: Defeat in Amravati because of BJP, Shinde's MLA Sanjay Gaikwad breaks down; Told what happened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.