पदवी, अन्य प्रवेश कसे होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:30 AM2021-07-26T04:30:59+5:302021-07-26T04:30:59+5:30

नक्कल विभागात सुविधांचा अभाव मोताळा: अनेक तहसील कार्यालयांत नक्कल विभागात सुविधांचा अभाव आहे. फेरफार मिळविण्यासाठी जाणाऱ्या शेतकरी ...

Degree, how will other admissions happen? | पदवी, अन्य प्रवेश कसे होणार?

पदवी, अन्य प्रवेश कसे होणार?

Next

नक्कल विभागात सुविधांचा अभाव

मोताळा: अनेक तहसील कार्यालयांत नक्कल विभागात सुविधांचा अभाव आहे. फेरफार मिळविण्यासाठी जाणाऱ्या शेतकरी व नागरिकांना या विभागात इंग्रज काळापासून असलेली दप्तरी नोंद जीर्ण झालेली आहे.

नदी खोलीकरण कामाला फटका

हिवरा आश्रम : सुजलाम‌् सुफलाम‌् प्रकल्पांतर्गत जिल्हा परिषद सिंचन यांच्या कार्यक्षेत्रातील नदी खोलीकरण करण्यात आले होते. परंतु सलग दाेन वर्षांपासून नदी खोलीकरणाच्या कामाला कोरोनाचा फटका बसत आहे. यंदाही उन्हाळ्यात खोलीकरणाची कामे होऊ शकली नाहीत.

अंगणवाड्यांना स्वतंत्र खोल्यांचा अभाव

बीबी: ग्रामीण भागातील लहान बालकांसाठी शासनाने बालविकास प्रकल्प कार्यालयांतर्गत अंगणवाड्या सुरू केल्या आहेत; मात्र अनेक अंगणवाड्यांना स्वतंत्र खोल्या नसल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात अनेक अडचणी येतात. पोषण आहाराचे धान्य कुठे ठेवावे असा प्रश्न निर्माण होतो.

शेत बांधाचे वाद वाढले

किनगाव राजा: शेत बांधाच्या वादातून मारहाण होण्याच्या घटना वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी अशा वादाच्या घटना घडत आहेत. काही प्रकरणे पोलीस स्टेशनपर्यंत जात आहेत.

क्रीडा प्रशिक्षण शिबीर दुसऱ्या वर्षीही रद्द!

बुलडाणा: कोरोनाच्या संसर्गामुळे यंदाचे उन्हाळी प्रशिक्षण शिबिरदेखील होऊ शकले नाही. गेल्यावर्षीही कोरोनामुळे ही शिबिरे झाली नाहीत. सलग दुसऱ्यावर्षी क्रीडा शिबिरे रद्द झाल्याने खेळाडूंच्या कौशल्यावर परिणाम होत आहे.

Web Title: Degree, how will other admissions happen?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.