तांत्रिक बिघाडामुळे पाणी पुरवठा लांबणीवर; खामगाव शहरातील नागरिक पुन्हा वेठीस

By अनिल गवई | Published: May 10, 2023 11:00 AM2023-05-10T11:00:44+5:302023-05-10T11:01:03+5:30

तांत्रिक बिघाड आणि वेळोवेळी उद्भवणार्या समस्यांमुळे शहरातील नागरिकांना कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागते.

Delay in water supply due to technical failure; Citizens of Khamgaon town again besieged | तांत्रिक बिघाडामुळे पाणी पुरवठा लांबणीवर; खामगाव शहरातील नागरिक पुन्हा वेठीस

तांत्रिक बिघाडामुळे पाणी पुरवठा लांबणीवर; खामगाव शहरातील नागरिक पुन्हा वेठीस

googlenewsNext

खामगाव: शहराला पाणी पुरवठा केल्या जाणार्या गेरू माटरगाव येथील पंपीग हाऊसवर तांत्रिक बिघाड झाल्याने शहराचा पाणी पुरवठा लांबणीवर पडणार असल्याचे संकेत आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात शहर वासीयांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

खामगाव शहराला गेरू माटरगाव येथील ज्ञानगंगा धरणावरून पाणी पुरवठा करण्यात येतो. यासाठी गेरू माटरगाव धरण ते जळका भंडग येथील जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी टाकण्यात आली आहे. तर गेरू माटरगाव येथून घाटपुरी नाका पाण्याची टाकी, तेथून वामन नगरातील बुस्टर पंपापर्यंत पाणी पोहोचविण्यात येते. त्यानंतर शहराच्या विविध भागात पाण्याचा ठराविक कालावधीत पुरवठा करण्यात येतो. दरम्यान, गेरू माटरगाव येथील धरणावर ट्री कटींग करण्यात येत आहे. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा खंडीत झाला असतानाच, मंगळवारी रात्री झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे पाणी पुरवठा आणखी लांबणीवर जाणार असल्याचे संकेत आहेत.

नित्याचीच समस्या...
तांत्रिक बिघाड आणि वेळोवेळी उद्भवणार्या समस्यांमुळे शहरातील नागरिकांना कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. शहर वासियांना साखळी पध्दतीने नऊ ते दहा दिवसाआड पाणी पुरवठा केल्या जातो. मात्र, तांत्रिक बिघाड झाल्यास तब्बल १३ ते १४ दिवस पाणी पुरवठा विलंबाने होतो. ही समस्या नित्याचीच झाली आहे. आता ऐन उन्हाळ्यात तांित्रक िबघाड झाल्याने नागरिक चांगलेच वेठीस धरल्या जात आहे. धरणात मुबलक साठा असतानाही शहर वासियांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नागिरकांमध्ये संतप्त भावना व्यक्त होत आहेत.

विकतच्या पाण्याचा आधार
गत तीन चार दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. अशातच पाणी पुरवठा खंडीत झाल्याने, लांबणीवर पडल्याने खामगाव वासियांना विकतच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत असल्याचे चित्र शहरातील सर्वच भागात दिसून येत आहे. लगीन सराईत विलंबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिक चांगलेच मेटाकुटीस आल्याचे दिसून येते.

Web Title: Delay in water supply due to technical failure; Citizens of Khamgaon town again besieged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.