आजीबाईंचा बटवा अन्‌ कोरोनाला हटवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:33 AM2021-05-24T04:33:02+5:302021-05-24T04:33:02+5:30

बुलडाणा : काेराेनाची दुसरी लाट ग्रामीण भागापर्यंत पाेहोचल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे़ ग्रामीण भागात अनेक आजारांवर घरगुती उपचार ...

Delete Grandma's wallet and corona! | आजीबाईंचा बटवा अन्‌ कोरोनाला हटवा !

आजीबाईंचा बटवा अन्‌ कोरोनाला हटवा !

Next

बुलडाणा : काेराेनाची दुसरी लाट ग्रामीण भागापर्यंत पाेहोचल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे़ ग्रामीण भागात अनेक आजारांवर घरगुती उपचार करण्याची पद्धत आहे़ काेराेनावरही गुळवेलचा काढा, हळद, तुळस आदींचा वापर ग्रामस्थ करीत असल्याचे चित्र आहे़

मार्च महिन्यापासून जिल्ह्यातील शहरांसह ग्रामीण भागात काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत आहे़ जिल्ह्यातील एकूण ६४० गावांमध्ये काेराेनाचे रुग्ण आढळत आहेत़ त्यातच काही गावे काेराेनाचे हाॅटस्पाॅट ठरत आहेत़ काेराेनामुळे मृत्यू हाेण्याचे प्रमाणही वाढल्याने ग्रामस्थांमध्ये काेराेनाची भीती वाढली आहे़ या भीतीतूनच अनेक जण लक्षणे नसली तरी घरगुती उपचार करीत असल्याचे चित्र आहे़ यामध्ये वाफ घेणे, हळद दुधातून किंवा पाण्यातून घेणे, तुळस, अश्वगंधा आदींचा उपयाेग करण्यात येत आहे़ ग्रामीण भागात अजूनही ताप आल्यास अनेक जण कडुनिंबाच्या पानांचा रस घेतात़ वयाेवृद्ध मंडळी आजही विविध आजारांवर घरगुती उपचार सुचवतात़ सध्या ग्रामीण भागात गुळवेलच्या काढ्याला माेठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे़ विशेषत: कडुनिंबाच्या झाडावर वाढलेली गुळवेली गुणकारी असल्याचे वृद्ध सांगतात़

काेट

काेराेना हा आजार जगभरासाठी नवीन आहे़ तसाच ताे आयुर्वेदासाठीही नवीन आहे़ आयुर्वेदात राेगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या अनेक औषधी उपलब्ध आहेत़ तुळस, अश्वगंधा, आवळा, हळद आदींचे वेगवेगळे महत्त्व आहे़ काेराेनाच्या काळात राेगप्रतिकारशक्ती चांगली असणे गरजेेचे आहे़

- डाॅ़ गजानन पडघन, आयुर्वेदाचार्य

कशाचा काय हाेताे फायदा

हळदीमुळे राेगप्रतिकारशक्ती वाढते

हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकार क्षमता वाढते़ रक्‍त शुद्ध होते, त्‍वचेचा रंग उजळतो, ही जंतुनाशक आहे. ही वनस्पती बारमाही आहे. हळद चूर्ण गरम पाण्याबरोबर घेतल्याने हृदयविकार, मधुमेह, कर्करोग, मेंदूचे विकार होण्यापासून प्रतिबंध होतो. पचनक्रिया सुधारते.

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असते

आवळ्यामध्ये सी व्हिटॅमिन असते. त्यामुळे शरीरातील व्हिटॅमिन आणि आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी रोज आवळ्याचे सेवन करणे आवश्यक आहे.यातील जीवनसत्त्वांमुळे त्वचेतील पेशी जलदगतीने दुरुस्त होतात. व्हिटॅमिन सी आपल्या डोळ्यांतील रक्तवाहिन्यांमध्ये अनावश्यक चरबी जमा होण्यापासूनही रोखण्याचे कार्य करते़

गुळवेलचा वापर वाढला

गुळवेल कफ कमी करण्यास मदत करते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवते. यामुळे दमा आणि खोकला यांसारख्या आजारांपासून बचाव होतो आणि फुफ्फुसांना निरोगी ठेवता येते. तसेच गुळवेलमुळे पचन क्रिया सुधारते़ तसेच बद्धकाेष्ठ, गॅस व इतर समस्या दूर हाेतात.

मीठ व गरम पाण्याने गुळण्या केल्यास घसा दुखणे कमी हाेते़ तसेच गुळवेलचा काढा घेतल्यास ताप, सर्दी, खाेकला कमी हाेताे़ काेराेना झालेल्यांना हा त्रास हाेताे़ त्यामुळे घरगुती उपचार म्हणून काढा सर्वांना घेण्याचा सल्ला देत असते़

लिलावती म्हस्के, ब्रम्हपुरी

काेराेना झाल्यानंतर सर्दी, खाेकला, ताप आदी लक्षणे असतात़ या लक्षणांवर आधीपासूनच घरगुती उपचार करण्यात येतात़ ताप असल्यास गुळवेलचा काढा आम्ही घेताे़ तसेच कडुनिंबाच्या पानांचा रसही तापावर गुणकारी आहे़

सर्दी, कफ वाढल्यास गरम पाण्याची वाफ घ्यावी़ तसेच तुळस, मिरे, लवंग, दालचिनी, सुंठ आदी एकत्रित करून त्याचा काढा आम्ही घेत असताे़ हाच उपाय मी इतरांनाही सांगते़

Web Title: Delete Grandma's wallet and corona!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.