दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या सिंदखेड राजातील सभेला परवानगी नाकारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 04:27 PM2018-01-06T16:27:16+5:302018-01-06T16:42:09+5:30

बुलडाणा : जिजाऊ जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंदखेड राजा येथे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची श्री संत भगवान बाबा महाविद्यालयात १२ जानेवारी रोजी होणाऱ्या  सभेस पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

Delhi Chief Minister Arvind Kejriwal's rally canceled at sindkheda raja | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या सिंदखेड राजातील सभेला परवानगी नाकारली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या सिंदखेड राजातील सभेला परवानगी नाकारली

Next
ठळक मुद्देसुरक्षा आणि रहदारीचा मुद्दा केंद्रस्थानी ठेऊन ही परवानगी नाकारण्यात आल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी बी. एन. नलावडे यांनी स्पष्ट केले आहे. राज्य शासनाचा त्यांच्यावर सभेला परवानगी न देण्यासाठी दबाव वाढला असावा, असा आरोप आम आदमी पार्टी तर्फे करण्यात येत आहे. यासंदर्भात अद्याप लिखीत स्वरुपात कुठलीही माहिती देण्यात आली नसल्याचे आपचे प्रभारी जिल्हा संयोजक सुनील मोरे यांनी स्पष्ट केले.

बुलडाणा : जिजाऊ जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंदखेड राजा येथे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची श्री संत भगवान बाबा महाविद्यालयात १२ जानेवारी रोजी होणाऱ्या  सभेस पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. सुरक्षा आणि रहदारीचा मुद्दा केंद्रस्थानी ठेऊन ही परवानगी नाकारण्यात आल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी बी. एन. नलावडे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, पोलिस सभेस परवानगी देण्यास टाळाटाळ करीत असून राज्य शासनाचा त्यांच्यावर सभेला परवानगी न देण्यासाठी दबाव वाढला असावा, असा आरोप आम आदमी पार्टी तर्फे करण्यात येत आहे. जिजाऊ जन्मोत्सव सोहळ््याच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासोबतच आपच्या राज्यातील सर्व पदाधिकार्यांची सभा सिंदखेड राजा येथे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल घेणार होते. त्यासाठी जिजाऊ सृष्टीनजीक असलेल्या श्री संत भगवान बाबा महाविद्यालयाची जागा यासाठी आम आदमी पक्षाच्या पदाधिकार्यांनी निश्चित करण्यात आली होती. त्यासंदर्भात जागा मालकाची ना हरकत, हेलीपॅडची जागा यासह सर्व बाबींची शहानिशाही पोलिसांसमवेत करण्यात आली होती. डिसेंबर महिन्याच्या मध्यावर यासंदर्भात पोलिसांना अनुषंगीक परवानगीसाठी पत्रही दिले होते. मात्र अचानक दोन जानेवारीला पोलिसांनी सुरक्षा आणि रहदारीच्या कारणावरून केजरीवालांच्या सिंदखेड राजा येथील या सभेस परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून सिंदखेड राजात सभा घेण्याबाबत आपण आग्रही असल्याचे आम आदमी पार्टीचे प्रभारी जिल्हा संयोजक सुनील मोरे यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. सभेसाठी आधी सिंदखेड राजा शहरातील तीन ते चार जागा बघितल्या होत्या. त्यापैकी नंतर श्री भगवान बाबा महाविद्यालयाची जागा निश्चित केली होती. पोलिसांनीही प्रत्यक्ष स्थळ पाहणीही केली होती. मात्र वेळेवर ही परवानगी नाकारण्यात आली आहे. यासंदर्भात अद्याप लिखीत स्वरुपात कुठलीही माहिती देण्यात आली नसल्याचे आपचे प्रभारी जिल्हा संयोजक सुनील मोरे यांनी स्पष्ट केले.

 सुरक्षा आणि रहदारीच्या कारणावरून ही परवानगी नाकारण्यात आली आहे. अन्यत्र ही सभा घेण्याबाबत आमचा आक्षेप नाही.

- बी. एन. नलावडे, उपविभागीय पोलिस अधिकारी, देऊळगाव राजा

पोलिस सभेला परवानगी देण्यास टाळाटाळ करीत आहेत. राज्य शासनाचा पोलिसांवर दबाव वाढला आहे. सभा त्याच ठिकाणी घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून सध्या आपण सिंदखेड राजा शहरात पोहोचत आहोत.

- सुनील मोरे, प्रभारी जिल्हा संयोजक, आम आदमी पार्टी, बुलडाणा

Web Title: Delhi Chief Minister Arvind Kejriwal's rally canceled at sindkheda raja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.