१0२0 मेट्रिक टन धान्याची केंद्राकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2016 01:40 AM2016-06-28T01:40:44+5:302016-06-28T01:40:44+5:30

केंद्रिय अन्नपुर्णा योजनेअंतर्गत गत सहा महिन्यांपासून धान्य पुरवठा का नाही, बोंद्रे यांच्या प्रश्नावर सरकारचा खुलासा.

Demand for 1020 metric tonnion grains center | १0२0 मेट्रिक टन धान्याची केंद्राकडे मागणी

१0२0 मेट्रिक टन धान्याची केंद्राकडे मागणी

Next

चिखली (जि. बुलडाणा): केंद्रीय अन्नपूर्णा योजनेमध्ये ६५ वर्ष किंवा त्यावरील निराधार स्त्री-पुरुषांना योजनेंतर्गत दरमहा गहू व तांदळाचे १0 किलो धान्य वाटप करण्यात येते. सदर योजना १ एप्रिल २00१ पासूून कार्यरत आहे. मात्र या वर्षीचे ऑक्टोबर २0१५ ते मार्च २0१६ च्या अन्नधान्याचे अद्यापही वितरण करण्यात आलेले नाही. यासंदर्भात चिखलीचे आमदार राहुल बोंद्रे यांनी अर्थसंकल्पीय मागण्यांमध्ये राज्याचे अन्नपुरवठा मंत्री ना. गिरीष बापट यांच्याकडे धान्य वितरणासाठी होत असलेल्या विलंबाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. याची दखल घेत ना.बापट यांनी खुलासा करताना विलंब झालेल्या कालावधीचे अन्नधान्य मिळण्यासाठी केंद्राकडे मागणी केली आहे. केंद्रीय अन्नपूर्णा योजनेच्या धान्य वितरणास विलंब होत असल्यामुळे लाभार्थींंंंंची हेळसांड होत होती. याची दखल घेत आ.राहुल बोंद्रे यांनी अन्नधान्य वितरणास विलंब का होतो आहे, असा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता. आ.बोंद्रे यांच्या प्रश्नाची दखल घेत राज्य सरकारने केंद्राकडे ऑ क्टोबर २0१५ ते मार्च २0१६ साठीच्या अन्नधान्याची मागणी केली आहे. तसेच एप्रिल २0१५ ते सप्टेंबर २0१५ या कालावधीकरिता प्र ितमाह १0२0 मे.टन अन्नधान्य यामध्ये (७५0 मे. टन गहू व ३३0 मे.टन तांदूळ) इतक्या अन्नधान्याची मागणी केली आहे. त्यानुसार बुलडाणा जिल्हय़ातील ३ हजार ७८८ लाभार्थींसह राज्यातील ७८ हजार ४२५ लाभार्थींकरिता ७८९ मे. टन (४८९ मे.टन गहू व ३00 मे.टन तांदूळ) अन्नधान्याचे जिल्हानिहाय मासिक नियतन देण्यात आले आहे. असा खुलासाही राज्याचे अन्नपुरवठा मंत्री ना. बापट यांनी आ.बोंद्रे यांना पत्राद्वारे कळविला आहे.

Web Title: Demand for 1020 metric tonnion grains center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.