बाेगस लाभार्थ्यांवर कारवाई करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:39 AM2021-08-12T04:39:13+5:302021-08-12T04:39:13+5:30
अंढेर : येथून जवळच असलेल्या निमगाव गुरू येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शाैचालयांचा लाभ अपात्र लाभार्थ्यांना देण्यात आला आहे़ ...
अंढेर : येथून जवळच असलेल्या निमगाव गुरू येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शाैचालयांचा लाभ अपात्र लाभार्थ्यांना देण्यात आला आहे़ याबाबत बाेगस लाभार्थ्यांचा पुरावाही देण्यात आला आहे़ मात्र, अजूनही कारवाई करण्यात आलेली नाही़ त्यामुळे,अपात्र लाभार्थ्यांवर कारवाईसह इतर मागण्यांसाठी अनिल चित्ते यांनी १५ ऑगस्टपासून उपाेषण करण्याचा इशारा दिला आहे़ निमगाव गुरु येथील शासकीय ई क्लास गट नंबर १०२ मधील जमिनीवर ग्रामपंचायत प्रशासनाने लावलेली मोठी वृक्षतोड करुन पुन्हा अतिक्रमण करण्यात आले आहे़ दोन वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने तत्कालीन संरपच व सचिव यांनी हजारो रुपये खर्च करून पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण पूर्णपणे हटवले होते. आता परत अतिक्रमण करण्यात आले असून गटविकास अधिकारी यांच्याकडून यावर कुठलीच ठोस कारवाई करण्यात आली नाही़ तसेच देऊळगाव राजा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्वच ग्रामपंचायत यांनी जैविक विविधता समिती अंतर्गत वीस हजार रुपयांचा चेक अदा करण्यात आले असून या योजनेने प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर काय कामे केली याबाबत सुद्धा सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली चित्ते यांनी केली आहे़ मागणी मान्य न झाल्यास १५ ऑगस्टपासून उपाेषण करण्याचा इशारा दिला आहे़
090821\3158img-20210809-wa0144.jpg
निमगाव गुरु तक्रार फोटो