आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:41 AM2021-09-04T04:41:16+5:302021-09-04T04:41:16+5:30
स्थानिक पत्रकार भवनात रजा अकॅडमी बुलडाणा जिल्ह्याच्या वतीने २ सप्टेंबर राेजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र ...
स्थानिक पत्रकार भवनात रजा अकॅडमी बुलडाणा जिल्ह्याच्या वतीने २ सप्टेंबर राेजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र वक्फ बोर्डचे माजी सदस्य हाजी जमील कादरी, मौलाना अब्बास रिजवी, नुरी मियां, इकबाल ओरा, सै. नदीम हाशमी, सचिव रईसोद्दीन काझी, जमीर रजासह इतर मान्यवर उपस्थित होते. २०१४ पासून केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर देशात मुस्लिमांवर अत्याचाराच्या घटनात भर पडली असल्याचा आरोपही सईद नुरी यांनी केला. काही समाजकंटक मुस्लिम धर्माचे संस्थापक पैगंबर साहेबांबद्दल अपशब्दाचा वापर करून सामाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्न करीत आहेत. अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. यावेळी बुलडाणा रजा अकॅडमीचे अशफाक हाजी, सै. समीर, समीर पठाण, जुबेर शेख, तस्लीम खान, वसीम उर्फ नूर कच्ची, काशान हुसेन आदी उपस्थित होते.