विना परवाना वृक्ष तोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:01 AM2021-03-13T05:01:49+5:302021-03-13T05:01:49+5:30
साखरखेर्डा: राताळी येथील एका शेतकऱ्याच्या धुऱ्यावरील वृक्षांची तोड करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी विठ्ठल गायकवाड यांनी केली आहे. राताळी ...
साखरखेर्डा: राताळी येथील एका शेतकऱ्याच्या धुऱ्यावरील वृक्षांची तोड करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी विठ्ठल गायकवाड यांनी केली आहे.
राताळी येथील विठ्ठल गायकवाड यांची गट नंबर २२० मध्ये ३ हेक्टर १६ आर. शेत जमीन आहे. त्यांच्या शेजारी गजानन पाटील यांची शेती असून त्यांनी ती शेत जमीन भागवत काळे मोहाडी यांना मागिल वर्षी विकली आहे. या दोन्ही शेतीच्या मध्ये वडिलोपार्जित सामुहिक धुरा आहे. या मध्ये पाणी जाण्यासाठी वहीवाट असून धुऱ्यावर अनेक प्रकारची झाडे आहेत. त्यात चंदन, गोंधन, लिंब, पळस अशा प्रकारची झाडे भागवत काळे यांनी जेसीबी लावून कुणाचीही परवानगी न घेता मुळासकट उपटून टाकली आहेत. पाणी जाण्याची वहीवाटही बुजवून धुऱ्यावर ताबा केला आहे. या व्यक्तीने अवैध रित्या झाडांची तोड करुन वनसंपदेचे नुकसान केले असून याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी ठाणेदार जितेंद्र आडोळे, वन विभागाकडे केली आहे.