कृत्रिमपाऊस पाडण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 11:14 PM2017-08-13T23:14:31+5:302017-08-13T23:15:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
डोणगाव : बुलडाणा जिल्हय़ात १५ ते २0 दिवसांपासून पाऊस नसल्याने अनेक ठिकाणची पिके संकटात सापडली आहेत. पिकांनी ऊन धरलेले असल्याने पिके कोमेजत आहेत. त्यामुळे येत्या चार दिवसांत कृत्रिम पाऊस पाडण्यात यावा, अशी मागणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी १२ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांना केली.
जिल्ह्यात पावसाअभावी पिकांची वाढ खुंटलेली आहे. या दिवसांत िपकांची वाढ झाल्याशिवाय शेतकर्याला चांगले उत्पन्न होणार नाही. कर्जमाफीची लागलेली अपेक्षा, खात्यात जमा होणारे १0 हजार रुपये या विवंचनेत शेतकरी असतानाच उन्हाचा पिकांना बसणारा फटका जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्यात यावा, अशी मागणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी केली आहे.