इग्नूचा ज्योतिष अभ्यासक्रम बंद करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:21 AM2021-07-05T04:21:53+5:302021-07-05T04:21:53+5:30
पावसाळ्यातही पाणीपुरवठा प्रभावित बुलडाणा : शहरालगत असलेल्या गावांचा पाणीपुरवठा पावसाळ्यातही प्रभावित होत आहे. सागवन, सुंदरखेड, माळविहीर गावे शहराला लागून ...
पावसाळ्यातही पाणीपुरवठा प्रभावित
बुलडाणा : शहरालगत असलेल्या गावांचा पाणीपुरवठा पावसाळ्यातही प्रभावित होत आहे. सागवन, सुंदरखेड, माळविहीर गावे शहराला लागून आहेत. त्यामुळे या गावांची लोकसंख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र, येथे पाणीपुरवठा लांबणीवर गेला आहे.
शेतात साचले पाणी
हिवरा आश्रम : गजरखेड शिवारात आठ दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले असून, पिकांना धोका निर्माण झाला आहे. काही भागात हा पाऊस पिकांसाठी जीवनदान ठरला आहे.
वन्य प्राण्यांपासून पिकांचे नुकसान
डोणगाव : सध्या सर्वत्र चांगला पाऊस पडत असल्यामुळे पिकेसुद्धा चांगली आहेत. मात्र, या पिकांना वन्य प्राण्यांचा धोका निर्माण होत आहे. हरणाचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. घाटबोरी परिसरातही वन्य प्राण्यांपासून पिकांचे नुकसान होण्याचे प्रमाण वाढले आहे.
पवार यांचा पीक स्पर्धेत प्रथम क्रमांक
बुलडाणा : तालुकास्तरीय रब्बी हंगाम पीक स्पर्धेतील प्रथम क्रमांक पाडळी येथील शेतकरी श्रीकांत आत्माराम पवार यांनी मिळविला आहे. त्यांना कृषी दिनी १ जुलै रोजी बुलडाणा येथे पंचायत समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.