शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:22 AM2021-07-03T04:22:30+5:302021-07-03T04:22:30+5:30
देऊळगाव राजा तालुक्यात उशिरा का होईना पेरणी योग्य समाधानकारक पाऊस झाला आहे. खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाही. मागील वर्षी ...
देऊळगाव राजा तालुक्यात उशिरा का होईना पेरणी योग्य समाधानकारक पाऊस झाला आहे. खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाही. मागील वर्षी खरीप व रब्बी हंगामात ऐन पिके बहरली असताना अवकाळी पावसामुळे सोयाबीन, हरभरा, ज्वारी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. परिणामी शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन झाले नाही. रब्बी हंगामात ही पावसाने पीक हिरावून घेतले. मागील वर्षीचे खरीप व रब्बी हंगामात निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्यांना नुकसानच सहन करावे लागले. चालू हंगामात पेरणीसाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाही, असे असताना बँकांमार्फत पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ होत आहे. अशा संकटाच्या काळात शासनाने रब्बी पिकाच्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई तत्काळ दिल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. त्यामुळे नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य शीलाताई शिंपणे यांनी केली आहे.