महिला बचत गटाच्या महिलांना कर्जफेडसाठी सवलत देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:35 AM2021-04-27T04:35:34+5:302021-04-27T04:35:34+5:30

संपूर्ण जगभरात कोरोना या विषाणूच्या प्रादुर्भावाने मोठ्या प्रमाणात जीवितहानी होत आहे. त्यामुळे सरकारने राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. ...

Demand for concession for loan repayment to women of women self help group | महिला बचत गटाच्या महिलांना कर्जफेडसाठी सवलत देण्याची मागणी

महिला बचत गटाच्या महिलांना कर्जफेडसाठी सवलत देण्याची मागणी

Next

संपूर्ण जगभरात कोरोना या विषाणूच्या प्रादुर्भावाने मोठ्या प्रमाणात जीवितहानी होत आहे. त्यामुळे सरकारने राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. लोणार तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेती कामगार, बांधकाम कामगार व इतर कामगार असून त्यांचा उदरनिर्वाह रोजंदारीवर आहे. परंतु सध्या लॉकडाऊनमुळे त्यांची रोजंदारी बंद असल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट बनली आहे. महिलांनी त्यांचे दैनंदिन जीवन, उपजीविका व विविध कारणांस्तव बचत गटाच्या माध्यमातून मायक्रो फायनान्सकडून कर्ज घेतलेले आहे. या कर्जाची परतफेड कशी करायची व आपले दैनंदिन जीवन, उपजीविका कशी चालवायची, असा प्रश्न महिलांसमोर उभा आहे. या महिलांना मायक्रो फायनान्स कंपनीकडून होत असलेली सक्तीची कर्जवसुली थांबवून कामगार महिलांना कर्जाची परतफेड करण्यासाठी सवलत मिळण्याकरिता निवेदन देण्यात आले. महिला बचत गटाच्या माध्यमातून मायक्रो फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतलेल्या महिलांना कर्जाची परतफेड करण्यासाठी सवलत मिळण्याबाबत संबंधितांना आदेश करावे, असे निवेदनत नमूद करण्यात आले आहे. या वेळी देवराज ठाकूर, विलास मापारी, संदीप शिंदे, वैभव कायंदे, सागर सिरसाठ, विठ्ठल मापारी, गौतम गवई आदी उपस्थित होते.

Web Title: Demand for concession for loan repayment to women of women self help group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.