डेंग्यूमुळे ड्रॅगन फ्रूटची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:13 AM2021-09-02T05:13:54+5:302021-09-02T05:13:54+5:30
गेल्या आठवड्याच्या तुलनेत ड्रॅगन फ्रूटच्या किमतीमध्ये घट झाली आहे. ड्रॅगन फ्रूट हे डेंग्यूवरील उपचारासाठी वापरले जाते. सध्या इतर फळांच्या ...
गेल्या आठवड्याच्या तुलनेत ड्रॅगन फ्रूटच्या किमतीमध्ये घट झाली आहे. ड्रॅगन फ्रूट हे डेंग्यूवरील उपचारासाठी वापरले जाते. सध्या इतर फळांच्या तुलनेत ड्रॅगन फ्रूटला अधिक किंमत आहे. एक ड्रॅगन फ्रूटची किंमत साधारणपणे ५० ते ८० रुपये इतकी आहे.
फळांचे दर (प्रतिकिलो)
ड्रॅगन फ्रूट : ६०, ७०, ८० प्रतिनग
सफरचंद : ८० ते १०० रुपये किलो
संत्रा : ५० ते ६० रुपये किलो
मोसंबी : ५० ते ६० रुपये किलो
चिकू : ३० ते ४० रुपये किलो
पेरू : ७० ते ८० रुपये किलो
डेंग्यूवर ड्रॅगनचा उतारा
सध्या शहरामध्ये डेंग्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे ड्रॅगनसारख्या फळांची मागणी वाढू लागली आहे. डेंग्यू झाल्यामुळे शरीरातील प्लेटलेट्सची संख्या कमी होते, मात्र ड्रॅगन किवीची फळे खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढून डेंग्यू बरा होतो असे काही लोकांचे म्हणणे आहे; मात्र यावर अजून कोणतेही शास्त्रीय संशोधन झालेले नाही. असे असले तरी या फळांमध्ये जीवनसत्त्वे असतात, ती शरीरासाठी उपयुक्त असतात.
आवक वाढल्याने सफरचंद स्वस्त
सध्या बाजारामध्ये सफरचंदाची आवक वाढल्या कारणामुळे सफरचंदाच्या किमती कमी झाल्या आहेत. मोठ्या प्रमाणात सफरचंद हे बाजारात आलेले आहेत. मागील दोन आठवड्यांपूर्वी सफरचंदाच्या किमती या साधारणपणे २०० रुपये किलो इतकी होत्या; मात्र, सध्या सफरचंदाची किंमत ८० ते १०० रुपये किलो इतकी झाली आहे. आवक वाढल्या कारणामुळे याचा परिणाम फळांच्या किमतीवर देखील झाला आहे.
सध्या बाजारात येणाऱ्या फळांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तर सध्याचे वातावरण पाहता ते खराब होऊ नये यासाठी लवकर विकणे बरे असल्याने मोठे व्यापारीसुद्धा त्यांच्याकडील माल किरकोळ विक्रेत्यांना कमी किमतीत देऊन मोकळे होतात. यामुळे किमती कमी झाल्या आहेत.
-सौरभ पवार, फळ विक्रेता.