ई-पीक पाहणी ऑफलाइन करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:37 AM2021-09-18T04:37:36+5:302021-09-18T04:37:36+5:30

शासनाच्या निर्णयानुसार शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेताचा पीक पेरा स्वत: मोबाइलवरून नोंद करावा, पिकाचे फोटो अपलोड करण्याबाबत आदेश आहेत. परंतु यामध्ये ...

Demand for e-crop survey offline | ई-पीक पाहणी ऑफलाइन करण्याची मागणी

ई-पीक पाहणी ऑफलाइन करण्याची मागणी

googlenewsNext

शासनाच्या निर्णयानुसार शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेताचा पीक पेरा स्वत: मोबाइलवरून नोंद करावा, पिकाचे फोटो अपलोड करण्याबाबत आदेश आहेत. परंतु यामध्ये शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणी येत असल्याने अनेक शेतकरी यापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रत्येक शेतकऱ्याजवळ अँड्रॉइड मोबाइल नाहीत आणि मोबाइल असला तरी बरेच शेतकरी असुशक्षित असल्याने साइट चालवता येत नाही. ओटीपी येत नाही. नेटवर्कच्या अडचणी आहेत, अशा अनेक समस्या ई-पीक पाहणीच्या नोंदीकरिता येत आहेत. झाडाची छायाचित्रे खराब येतात. क्षेत्राची नोंद कशी करावी, अशा अनेक कारणांमुळे शासनाच्या योजनेपासून शेतकऱ्यांना वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

शासनाच्या वतीने आपले प्रतिनिधींकडून शेतकऱ्याच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन पिकाची पाहणी करून नोंदी करून घ्याव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Web Title: Demand for e-crop survey offline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.