लसीकरण केंद्र वाढविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:28 AM2021-05-03T04:28:52+5:302021-05-03T04:28:52+5:30
देऊळगाव राजा : शासनाच्या वतीने देऊळगाव राजा शहरात ग्रामीण रुग्णालयात एकाच लसीकरण केंद्र सध्या स्थितीत सुरू आहे. ...
देऊळगाव राजा : शासनाच्या वतीने देऊळगाव राजा शहरात ग्रामीण रुग्णालयात एकाच लसीकरण केंद्र सध्या स्थितीत सुरू आहे. त्यामुळे नागरिकांच्या रांगा लागत असल्याने, लसीकरण केंद्र वाढवण्याची मागणी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हाप्रमुख गिरीश वाघमारे यांनी केली आहे.
कोरोना महामारीचा संपूर्ण देशात अनेक राज्यांसह जिल्ह्यातील नागरिकांना सामना करावा लागत आहे. त्यात आता कोरोनाची दुसरी लाट उफळून आली आहे. त्याचे परिणाम म्हणजेच रुग्णसंखेत झपाट्याने वाढ झाली आहे. शासनाने दुसरी लाट रोखण्यासाठी शासनाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. लसीकरण हाच योग्य उपाय असून, आम्ही शिवसेनेच्या वतीने लसीकरण केंद्राची शासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करून पाहणी केली असता, तेथे प्रचंड गर्दी होत आहे. अनेक वयोवृद्ध नागरिकांना लस घेण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याने, शहरात काही ठिकाणी लसीकरण केंद्र वाढविण्याची मागणी तहसील कार्यालयाकडे केली आहे. यावेळी शिवसेना नेते सचिन व्यास, माथडी कामगार सेनेचे उपजिल्हाप्रमुख अभय दिडहाते, शिवसेना उपशहरप्रमुख आतिश खराट, तौसीफ कोटकर आदी उपस्थित हाेते.