खतांची दरवाढ तात्काळ रद्द करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:35 AM2021-05-18T04:35:38+5:302021-05-18T04:35:38+5:30
सिंदखेडराजा : केंद्र सरकारने खत आणि पेट्रोलियम पदार्थांच्या वाढत्या किमती तात्काळ मागे घ्याव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात ...
सिंदखेडराजा : केंद्र सरकारने खत आणि पेट्रोलियम पदार्थांच्या वाढत्या किमती तात्काळ मागे घ्याव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.
सिंदखेडराजा शहर, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी तहसीलदारांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. देशात कोरोना परिस्थिती बिकट असताना पेट्रोल, डिझेलचे दर शंभरी पार झाले आहेत. सध्या लॉकडाऊनचा मार झेलत असलेल्या शेतकरीवर्गाला दिलासा देण्याऐवजी खतांच्या किमती वाढवून केंद्र सरकारने सामान्य शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम केले आहे. रासायनिक खतांच्या किमतीत सहाशे तर डीएपी खतांच्या किमती ७१५ रुपयांची बेसुमार वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ तात्काळ रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाझरे काजी, तालुकाध्यक्ष शिवाजीराजे जाधव, शहराध्यक्ष राजेंद्र आभोरे, जगन सहाणे, मंगेश खुरपे, सतीश सरोदे, यासीन शेख, नितीन चौधरी यांची उपस्थिती होती.