ईसोली येथील पुलाची उंची वाढवण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:25 AM2021-05-31T04:25:31+5:302021-05-31T04:25:31+5:30
इसोली : जानेफळकडे जाणाऱ्या रस्त्यावर ग्रामपंचायतीच्यावतीने नाल्यावर पूल बांधलेला आहे़. या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात वाहतूक ठप्प हाेते़. ...
इसोली : जानेफळकडे जाणाऱ्या रस्त्यावर ग्रामपंचायतीच्यावतीने नाल्यावर पूल बांधलेला आहे़. या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात वाहतूक ठप्प हाेते़. त्यामुळे या पुलाची उंची वाढविण्याची मागणी सरपंचांसह सदस्य व ग्रामस्थांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे़. चिखली तालुक्यातील इसोली हे गाव खामगाव ते चिखली या राष्ट्रीय महामार्गाला जोडले आहे़. या गावांसह या भागातील १० ते १५ खेडी याच गावावरून या तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते़. इसाेली गावाजवळ असलेल्या नाल्यावर पूल बांधलेला आहे़. उंची कमी असल्याने पावसाळ्यात पुलावरून पाणी राहते़, त्यामुळे या परिसरातील वाहतूक ठप्प हाेते़. सार्वजनिक बांधकाम उपविभाग, चिखलीच्याअंतर्गत येणारा हा रस्ता आहे़. दरवर्षी माेठ्या प्रमाणात पाऊस हाेत असल्याने नाल्याला पूर राहताे़ तसेच पुलावरून पाणी वाहत असते़, त्यामुळे शेतातून घरी येणाऱ्या शेतकऱ्यांना, एसटी बसेस, दुचाकी वाहनधारकांना ताटकळत रहावे लागते़. या पुलाची उंची कमी असल्याने गुरे वाहून जाण्याची भीती आहे़. त्यामुळे या पुलाची उंची तातडीने वाढविण्याची मागणी ग्रामस्थांनी चिखली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे़. पुलाची उंची वाढविण्याची मागणी गत अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे़; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे़. या पुलाची उंची न वाढविल्यास आंदाेलन करण्याचा इशारा सरपंच सुनील अर्जुनराव शेळके यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे़.