महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:34 AM2021-04-01T04:34:36+5:302021-04-01T04:34:36+5:30
बुलडाणा : पोलीस प्रशासनासमोर महाविकास आघाडीचे सरकार हतबल झाले आहे. राज्यासह मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यातच जिजाऊ लेकींवर अन्याय अत्याचार, अपहरण ...
बुलडाणा : पोलीस प्रशासनासमोर महाविकास आघाडीचे सरकार हतबल झाले आहे. राज्यासह मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यातच जिजाऊ लेकींवर अन्याय अत्याचार, अपहरण प्रकरणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. या गंभीर घटनांची दखल घेत किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अविनाश काकडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांना महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या वाढत्या प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
बुलडाणा शहरातील राऊत कॉम्प्लेक्स या ठिकाणी जनहितार्थ सेवा करणाऱ्या आझाद हिंद महिला संघटनेच्या प्रदेश संपर्क प्रमुख सौ. सुरेखाताई निकाळजे यांच्यावर गैरकायदेशीर मार्गाने गाळे ताब्यात घेण्यासाठी मागील महिन्यात प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज असतानाही पोलीस प्रशासनाने फक्त एनसी रिपोर्टची नोंद घेऊन धनदांडग्या वैद्यकीय तज्ज्ञ, उच्चशिक्षित आरोपींना पाठीशी घातले असल्याचा आरोप किसान ब्रिगेडच्यावतीने करण्यात आला आहे. या प्रकरणात आजपर्यंत आरोपींना अटक झालेली नाही. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी, तसेच पोलीस प्रशासनातील संबंधित सर्व दोषी अधिकारी यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.