वृक्षलागवड कामाच्या चौकशीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:23 AM2021-06-10T04:23:36+5:302021-06-10T04:23:36+5:30
लोणार तालुक्यात १ एप्रिल २०२० पासून महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत लोणार तालुक्यात वृक्ष लागवड बाबत माहिती ...
लोणार तालुक्यात १ एप्रिल २०२० पासून महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत लोणार तालुक्यात वृक्ष लागवड बाबत माहिती अधिकारात माहिती मागितली होती. त्यामध्ये तालुक्यातील काही गावाच्या रस्त्याच्या कडेला दुतर्फा वृक्षलागवडीची कामे वनविभाग मार्फत करण्यात आली आहेत. त्यामध्ये वृक्ष लागवड करताना खड्डे थातुरमातुर खोदून व त्याला कुठल्याही प्रकारचे रासायनिक खत किंवा शेणखत दिले गेले नाही. वृक्षाचे गुराढोरांपासून संगोपन करण्याकरिता काटेरी कुंपण केले नाही. उन्हाळ्यात वृक्ष जवळील पालापाचोळा स्वच्छ केला नसल्याने वृक्ष जळून गेली आहेत. तसेच पाणीही देण्यात आले नसल्याचा आराेप निवेदनात करण्यात आला आहे. वृक्ष लागवडीच्या कामाची व नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत गट लागवड झालेल्या कामाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर, ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनात दिला आहे. निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड व लोणार तालुका अध्यक्ष अनिल मोरे यांच्यासह इतरांची स्वाक्षरी आहे.