मोबाइल उपलब्ध करून देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:22 AM2021-06-23T04:22:59+5:302021-06-23T04:22:59+5:30

लाट आणणे आणि थांबवणे आपल्याच हाती बुलडाणा : पहिल्या लाटेची तीव्रता कमी झाल्यानंतर अनलॉकमध्ये बहुतांशी निर्बंध हटवले गेले. बाजार ...

Demand for mobile availability | मोबाइल उपलब्ध करून देण्याची मागणी

मोबाइल उपलब्ध करून देण्याची मागणी

Next

लाट आणणे आणि थांबवणे आपल्याच हाती

बुलडाणा : पहिल्या लाटेची तीव्रता कमी झाल्यानंतर अनलॉकमध्ये बहुतांशी निर्बंध हटवले गेले. बाजार व सोहळे गजबजून गेले. याचा थेट परिणाम एप्रिल महिन्यानंतर दिसून आला, कोरोनाबाधितांच्या संख्येने अनपेक्षित उसळी घेतली. त्यामुळे कोरोनाची लाट आणणे किंवा थांबवणे आपल्याच हाती आहे, असे मत डॉक्टरांमधून व्यक्त होत आहे.

बस सुरू झाल्याने विक्रेत्यांमध्ये समाधान

बुलडाणा : बससेवा सुरू झाल्याने स्थानकावर विविध वस्तू विक्री करणाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. बसस्थानकावर पाणी, भेळ तसेच गोळ्या बिस्किटे विकून अनेकजण आपला उदरनिर्वाह करतात. बसबंद होती तेव्हा त्यांची वस्तूविक्री ठप्प झाली होती.

बियाणांचे अनुदान वाढवावे

सुलतानपूर : शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे देऊनही भाववाढीमुळे बियाणे खरेदी परवडत नाही. शेतकरी सध्या अडचणीत असल्याने अनुदान वाढविण्याची मागणी आहे. लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद झाल्याने मातीमोल भावात माल विकावा लागला.

घरफोडीच्या घटना वाढल्या

बुलडाणा : जिल्ह्यात घरफोडीच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी माळविहीर परिसरात भर दिवसा घरफोडी झाली होती. त्यानंतर मेहकर तालुक्यातील सारशीव येथे चोरट्यांनी एकाच रात्री दोन घरफोड्या होऊन त्यात तीन लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना १६ जून रोजी उघडकीस आली होती.

Web Title: Demand for mobile availability

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.