नगर पालिकेच्या जागेतील दुकानासाठी पैशांची मागणी, चौघांना बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 12:41 PM2021-03-29T12:41:47+5:302021-03-29T12:41:54+5:30

एक गंभीर : खामगाव नगरपालिका कर्मचाऱ्यासह १५ जणांविरोधात गुन्हा

Demand for money for shop in municipal land, four beaten to death in khamgaon | नगर पालिकेच्या जागेतील दुकानासाठी पैशांची मागणी, चौघांना बेदम मारहाण

नगर पालिकेच्या जागेतील दुकानासाठी पैशांची मागणी, चौघांना बेदम मारहाण

Next

खामगाव - स्थानिक नगर पालिकेच्या जागेतील दुकानासाठी पैशांच्या मागणी दबावतंत्राचा वापर करून एका नगर पालिका कर्मचाºयासह १५ जणांनी चौघांना बेदम मारहाण केली.  यात एकाची प्रकृती गंभीर असून, तिघे जखमी झालेत. ही घटना खामगाव येथील आठवडी बाजारात २७ मार्च रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी तक्रारीवरून शहर पोलिसांनी संबंधित पालिका कर्मचाºयांसह तब्बल १५ जणांविरोधात रविवारी उशीरा रात्री विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

सुटाळा येथील राजेंद्र नामदेव इंगळे आणि त्यांचे भाऊ गुलाब इंगळे, निलेश इंगळे यांचे आठवडी बाजारात भंगारचे दुकान आहे.  हे दुकान नगर पालिकेच्या जागेत असल्याने दबावतत्रांचा वापर करून मोहन देवीनारायण अहीर यांनी इंगळे यांना पैशांची मागणी केली. इंगळे यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने मोहन अहीर यांनी संगनमत करून गैरकायद्याची मंडळी  जमविली. त्यानंतर राजेंद्र इंगळे यांच्यासह चौघांना लोखंडी पाइप, हातोडी, लोखंडी झारा आणि सेन्ट्रींगच्या राफ्टरने मारहाण केली. यात डोक्यावर लोखंडी हतोडीचा मार लागल्याने अभय इंगळे गंभीर जखमी झाला आहे. तर राजेंद्र इंगळे, गुलाब इंगळे, निलेश इंगळे जखमी झालेत. गंभीर जखमी असलेल्या अभय इंगळे यांच्यावर अकोला येथील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर उर्वरीत तिघांवर खामगाव येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आह

याप्रकरणी राजेंद्र नामदेवराव इंगळे ( ५६) रा. सुटाळपुरा यांच्या तक्रारीवरून मोहन देवीनारायण अहीर, रामू देवीनारायण अहीर, रतन देवीनारायण अहीर, मनोज अहीर, आशीष अहीर, अक्षय मोहन अहीर, आदित्य मोहन अहीर, रोशन अहीर, श्याम अहीर, आकाश वायचाळ सर्व रा. सतीफैल, विक्की पारधी, राम मदन वगर, बाळू अतकरे, रुघू तिवारी, विलास वाशीमकर सर्व रा. आठवडी बाजार खामगाव यांच्या विरोधात शहर पोलीसांनी भादंवि कलम ३२५, १४३, १४७, १४८, १४९, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला.

हाय होल्टेज ड्रामानंतर अखेर गुन्हा दाखल
आठवडी बाजारात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी दबावतंत्रातून एकाच परिवारातील चौघांवर नगर पालिका कर्मचाºयासह १५ पेक्षा अधिक जणांनी सिनेस्टाईल हल्ला चढविला. याप्रकरणी जखमींवर पोलीसात तक्रार न करण्यासाठी तर पोलीसांनी गुन्हा दाखल करू नये, असा दबाव आणण्यात आला. मात्र, कोणत्याही दबावाला बळी न पडता, आठवडी बाजारातील दादागिरी मोडीत काढण्यासाठी अन्यायग्रस्त इंगळे यांनी याप्रकरणी पोलीसांत तक्रार दाखल केली. हाय होल्टेज ड्रामानंतर रविवारी उशीरा रात्री शहर पोलीसांनी याप्रकरणी नगर पालिका कर्मचारी मोहन अहीर यांच्यासह १५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला.

आठवडी बाजार बनले ‘मिनी बिहार’
. खामगाव येथील आठवडी बाजारात  अहीर यांच्या परिवाराचे होलसेल अंडा विक्रीचे दुकान आहे. दरम्यान, बाजारातील ‘वसुली’तून अनेकदा आठवडी बाजारात वाद उद्भवतात. काही दिवसांपूर्वीच नगर पालिकेतील एका उच्च पदस्थ पदाधिकाऱ्यालाही येथे मारहाण झाली होती. याप्रकरणी इज्जतीचा प्रश्न म्हणून पालिका पदाधिकाºयाने पोलीस तक्रार टाळली होती. तेव्हापासून या ठिकाणी संबंधितांची दादागिरी वाढली असून आठवडी बाजाराची ‘मिनी बिहार’कडे वाटचाल सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. 
 

Web Title: Demand for money for shop in municipal land, four beaten to death in khamgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.