जातप्रमाणपत्रासाठी लाचेची मागणी; सेतू ऑपरेटरला अटक
By सदानंद सिरसाट | Updated: June 29, 2024 19:52 IST2024-06-29T19:52:20+5:302024-06-29T19:52:27+5:30
नांदुरा : जातप्रमाणपत्राचा ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी नांदुरा येथील बळीराजा ई-सेवा केंद्राचा संचालक प्रशांत वाकोडे याने ५०० रुपयांची लाच मागितल्याने ...

जातप्रमाणपत्रासाठी लाचेची मागणी; सेतू ऑपरेटरला अटक
नांदुरा : जातप्रमाणपत्राचा ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी नांदुरा येथील बळीराजा ई-सेवा केंद्राचा संचालक प्रशांत वाकोडे याने ५०० रुपयांची लाच मागितल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला ३०० रुपयांची लाच घेताना शनिवारी अटक केली.
याप्रकरणातील तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार २३ जानेवारी २०२४ रोजी लाच मागणी पडताळणी केली होती. त्यानुसार बळीराजा ई-सेवा केंद्राचा संचालक तसेच नांदुरा तहसील कार्यालयातील निवडणूक विभागातील संगणक परिचालक असलेला लोकसेवक प्रशांत वाकोडे याने सुरुवातीला ५०० रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ३०० रुपये लाच स्वीकारण्यास संमती दिली.
परंतु, आरोपी हे लोकसेवक असल्याची खात्री नसल्याने त्याबाबत कायदेशीर मार्गदर्शन घेण्यात आले. तशी खात्री झाल्याने आरोपीला ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध लाच मागणीबाबत पोलिस स्टेशन नांदुरा येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक सचिन इंगळे, पोलिस हेडकॉन्स्टेबल विलास साखरे, प्रवीण बैरागी, विनोद लोखंडे, जगदीश पवार, रंजित व्यवहारे, शेख अर्शद यांनी पार पाडली.