मालमत्ता करात सूट देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:22 AM2021-07-09T04:22:51+5:302021-07-09T04:22:51+5:30
ढगाळ हवामानामुळे आजारांमध्ये वाढ बीबी : परिसरात रोगट व ढगाळ हवामान असल्याने आजारांमध्ये वाढ होत आहे. या बदलत्या हवामानाचा ...
ढगाळ हवामानामुळे आजारांमध्ये वाढ
बीबी : परिसरात रोगट व ढगाळ हवामान असल्याने आजारांमध्ये वाढ होत आहे. या बदलत्या हवामानाचा अनेकांना त्रास होत आहे. सर्दी, खोकला, ताप या आजारांमध्ये वाढ झाली आहे.
बाल आधार नोंदणी शिबिर
मोताळा : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत बालकांसाठी एकत्रितरीत्या विविध उपक्रमांचे शिबिर घेण्यात येतात. अंगणवाडीमध्ये बालआधार नोंदणी शिबिर घेणे आवश्यक आहे. अंगणवाडीमधून विविध सेवा देताना लाभार्थींचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
बचत गटांच्या माध्यमातून उन्नती
बुलडाणा : तालुक्यातील महिला बचतगटांच्या माध्यमातून विविध प्रकारचा माल व गृहोपयोगी वस्तूंचे उत्पादन केले जात असून, अशा उत्पादित वस्तूंच्या विक्रीसाठी शहरात स्टॉल अथवा व्यावसायिक छत्र्या उपलब्ध करून देण्याची गरज आहे. बचतगटांच्या माध्यमातून महिलांनी आर्थिक उन्नती साधली आहे.
हाडांचे त्रास वाढले
बुलडाणा : सध्या गुडघे दुखीमुळे त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये ४० वर्षांपुढील रुग्णांचा समावेश आहे. विशेषत: ज्येष्ठ नागरिक घरातच कोंडले गेले असून, सूर्यप्रकाश कमी मिळाल्यानेही हाडांचे त्रास वाढले आहेत.
गतिरोधकाची उंची प्रमाणापेक्षा अधिक
मेहकर : बुलडाणा ते मलकापूर रोडवर असलेल्या काही ठिकाणच्या गतिरोधकाची उंची प्रमाणापेक्षा जास्त आहे. त्यामुळे गतिरोधकावरून वाहने वेगाने येत असल्याने या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
अर्धवट रस्ता कामाने वाढली डोकेदुखी
हिवरा आश्रम : परिसरातील काही भागातील रस्ते एका बाजूला झाले; दुसऱ्या बाजूचे रस्ता काम रखडलेले आहे. या अर्धवट कामामुळे रस्ता अपघाताला निमंत्रण ठरत असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागात टिकाऊ व दर्जेदार रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यापैकी काही रस्त्यांची कामे अर्धवट झालेली आहेत.