पेट्रोल, डिझेल दरवाढ कमी करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:23 AM2021-06-19T04:23:31+5:302021-06-19T04:23:31+5:30
पेट्रोलियम विभागाचे केंद्रीय सचिव व राज्य विक्रीकर विभागाचे सचिव यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे. पेट्रोल, ...
पेट्रोलियम विभागाचे केंद्रीय सचिव व राज्य विक्रीकर विभागाचे सचिव यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे. पेट्रोल, डिझेल व खाद्यतेल जीवनावश्यक वस्तू असून, त्यावर केंद्र सरकार ३३ रुपये प्रतिलिटर पेट्रोलवर व ३२ रुपये प्रतिलिटर डिझेलवर कर आकारत आहे, तर राज्य सरकार २५ टक्के पेट्रोलवर व २२ टक्के डिझेलवर कर आकारत आहे. केंद्र व राज्य सरकारने पेट्रोल, डिझेलवर आकारलेला कर कमी करून पेट्रोल, डिझेल व खाद्यतेलाचे दर कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी एमआयएम मेहकरच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदनावर युवा नेते शोएब अली, शेख जुनैद, मो.सलमान, कलीम शाह, सादिक खान, शेख मुद्दसिर बाबर खान आदींच्या स्वाक्षरी आहेत.