परीक्षा क्षुल्क परत देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:56 AM2021-05-05T04:56:51+5:302021-05-05T04:56:51+5:30

प्रकल्पांतर्गत ३५४ शेतकऱ्यांना लाभ बुलडाणा : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत चिखली तालुक्यातील मंगरुळ येथील ३५४ शेतकऱ्यांना लाभ मिळाला. ...

Demand for return of trivial examination | परीक्षा क्षुल्क परत देण्याची मागणी

परीक्षा क्षुल्क परत देण्याची मागणी

Next

प्रकल्पांतर्गत ३५४ शेतकऱ्यांना लाभ

बुलडाणा : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत चिखली तालुक्यातील मंगरुळ येथील ३५४ शेतकऱ्यांना लाभ मिळाला. जिल्ह्यातील ४१३ गावांमधील शेतकरी या प्रकल्पांतर्गत सुखी, समृद्ध हाेण्यास मदत झाली आहे.

अवैध दारूविक्री बंद करण्याची मागणी

सिंदखेड राजा : तालुक्यातील ग्रामीण भागात गत काही दिवसांपासून अवैध दारू विक्री माेठ्या प्रमाणात सुरू आहे. दारू विकत घेण्यासाठी बाहेरगावातील लाेक गर्दी करीत असल्याने काेराेना संसर्ग पसरण्याची भीती आहे.

वीज कर्मचाऱ्यांची मुख्यालयाला दांडी

धामणगाव बढे : गावामध्ये वीज वितरणसंदर्भात विविध समस्या असताना व वेळोवेळी त्या संबंधीचे निवेदन देऊनही त्याची दखल घेण्यात येत नाही. त्यामुळे त्रस्त होऊन ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी वीज वितरण कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

पार्किंगची व्यवस्था करण्याची मागणी

बुलडाणा : प्रशासकीय इमारतीमध्ये विविध कार्यालये आहेत. इमारत परिसरात पार्किंगची कुठलीही व्यवस्था नाही. त्यामुळे वाहनधारक कुठेही आपली वाहने उभी करीत असल्याने वाहतुकीस अडथळा येत आहे. त्यामुळे पार्किंगची व्यवस्था करण्याची मागणी हाेत आहे.

सुतारांना आर्थिक मदत देण्याची मागणी

साखरखेर्डा : लाॅकडाऊनमुळे सुतारकाम करणाऱ्या कारागिरांवर आर्थिक संकट आले आहे. सिंदखेड राजा तालुक्यात सुतार व्यवसाय करणाऱ्या कामगारांची संख्या जास्त आहे. कामे बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याने मदत देण्याची मागणी हाेत आहे.

खताचे भाव वाढल्याने शेतकरी अडचणीत

धामणगाव धाडः निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामात पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच खरीप हंगामासाठी रासायनिक खतांचे भाव वाढल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले

साखरखेर्डा : लाॅकडाऊनच्या काळात किराणा दुकानदारांची चांदी होत असून, शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त भावाने मालाची विक्री केली जात आहे. यावर अन्न व औषध प्रशासनाने ठोस पाऊल उचलून जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी हाेत आहे.

विम्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

धामणगाव बढे : खरीप हंगाम संपून पाच महिने लोटले असतानाही व शेतकऱ्यांचेे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेे असताना, पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांना कवडीचीही मदत पीकविमा कंपनीकडून झाली नाही. शासन स्तरावरही कुठल्याही हालचाली होताना दिसत नाही.

औषधांचा काळा बाजार थांबवा

बुलडाणा : कोरोना औषधाचा काळाबाजार करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी ग्राहक पंचायतच्या वतीने प्रशासनाला दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

Web Title: Demand for return of trivial examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.