सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:32 AM2021-03-06T04:32:26+5:302021-03-06T04:32:26+5:30
व्यावसायिकांनी काेराेना चाचणीकडे फिरविली पाठ बुलडाणा : सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाने कोरोनाविषयी ...
व्यावसायिकांनी काेराेना चाचणीकडे फिरविली पाठ
बुलडाणा : सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाने कोरोनाविषयी जनजागृती सुरू केली आहे. व्यावसायिकांनी काेराेना चाचणी करावी, असेही आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले हाेते. मात्र, अनेक व्यापारी आणि व्यावसायिकांनी काेराेना चाचणीकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.
कर वसुलीसाठी ग्रामपंचायती सरसावल्या
बुलडाणा : थकीत कर वसुलीसाठी ग्रामपंचायतींच्या वतीने विविध उपाययाेजना राबण्यात येत आहेत. माेताळा तालुक्यातील स्मार्ट ग्राम शेलगाव बाजार येथे १०० किलाे डाळ माेफत करण्याचा निर्णय घेतला आहे.
सूर्यफुलाचे पीक बहरले
बुलडाणा: यावर्षी मुबलक पाणी असल्याने शेतकरी रबीची विविध पिके घेत आहेत. सध्या सूर्यफुलाचे पीक बहरले असून, येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. शेतकऱ्यांना सूर्यफुलाच्या पिकाकडून शेतकऱ्यांना अपेक्षा आहेत.
खासगी डाॅक्टरांचा सेवा बंद करण्याचा इशारा
बुलडाणा : आराेग्य कर्मचाऱ्यांसह फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना काेविशिल्ड लस देण्यात येत आहे. मात्र, लाेणार तालुक्यातील खासगी डाॅक्टरांना अजूनही लस देण्यात आलेली नाही. त्यामुळे, लसीकरण न केल्यास सेवा बंद करण्याचा इशारा खासगी डाॅक्टरांनी दिला आहे.
दुकानदारांना काेराेना चाचणी बंधनकारक
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता, कोविड नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. याअंतर्गत दुकानदारांची काेराेना चाचणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
उपस्थिती भत्त्यावरील स्थगिती हटवावी
बुलडाणा : विद्यार्थ्यांच्या उपस्थिती भत्त्यावर शासनाने काेराेनाचे कारण समाेर करून स्थगिती दिली आहे. ही स्थगिती हटविण्याची मागणी शिक्षक परिषदेने राज्य शासनाला दिलेल्या निवेदनात केली आहे. अनेक विद्यार्थी लाभापासून वंचित राहणार आहेत.