उसनवारीच्या पैशांच्या मोबदल्यात विवाहितेला शरीरसुखाची मागणी; विनयभंगाचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 02:52 PM2018-02-22T14:52:19+5:302018-02-22T14:55:05+5:30
खामगाव: ‘पती’कडून उसनवारीचे पैसे देण्यास विलंब होत असल्याचा राग धरून आरोपीने बर्डे प्लॉट भागातील एका २७ वर्षीय विवाहितेला शरीरसुखाची मागणी करून विनयभंग केला.
खामगाव: ‘पती’कडून उसनवारीचे पैसे देण्यास विलंब होत असल्याचा राग धरून आरोपीने बर्डे प्लॉट भागातील एका २७ वर्षीय विवाहितेला शरीरसुखाची मागणी करून विनयभंग केला. ही घटना १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता घडली. याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून शिवाजी नगर पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला.
बर्डे प्लॉट भागातील एका २७ वर्षीय विवाहितेच्या पतीने आरोपीकडून पैसे उसने घेतले होते. ही रक्कम परत देण्यास विलंब होत असल्याचा राग बाळगत गेल्या काही दिवसांपासून संबधीत आरोपीकडून विवाहितेस त्रास दिल्या जात होता. उसनवारीच्या पैशांसाठी तगादा लावतानाच, विवाहितेच्या पतीला तसेच मुलाला जीवे मारण्याची धमकीही आरोपीकडून केली जात होती. दरम्यान, आरोपीने १७ फेब्रुवारी रोजी विवाहिता घरात एकटी असताना, कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच उसनवारीच्या पैशांच्या मोबदल्यात वाईट उद्देशाने जवळ येऊन शरीरसुखाची मागणी केली. याप्रकाराने लज्जीत झालेल्या विवाहितेने १७ फेब्रुवारी रोजी उंदीर मारण्याचे विषारी औषध प्राशन केले. प्रकृती अत्यवस्थ असल्याने ही महिला खामगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती होती. २१ फेब्रुवारी रोजी रूग्णालयातून सुटी झाल्यानंतर विवाहितेने शिवाजी नगर पोलिस स्टेशन तक्रार दिली. या महिलेच्या तक्रारीवरून शिवाजी नगर पोलिसांनी वाजीद शमशाद पठाण याच्या विरोधात कलम ३५४-अ, ४५२, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला.