महागाई व भारनियमन विरोधात शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 07:49 PM2017-09-21T19:49:48+5:302017-09-21T19:50:00+5:30

मेहकर : पेट्रोल, डिझेल व गॅसचे सतत वाढणारे भाव आणि भारनियमन या विरोधात शिवसेनेच्यावतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. 

Demand for Shiv Sena Chief Minister against inflation and weightlifting | महागाई व भारनियमन विरोधात शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

महागाई व भारनियमन विरोधात शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

Next
ठळक मुद्देसर्वसामान्य नागरिकांची कोंडी; विद्यार्थ्यांचे परीक्षेचे दिवसभारनियमन बंद करावे पेट्रोल, डिझेल व गॅसचे भाव तात्काळ कमी करावे - मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : पेट्रोल, डिझेल व गॅसचे सतत वाढणारे भाव आणि भारनियमन या विरोधात शिवसेनेच्यावतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. 
राज्यात वर्षभरापासून पेट्रोल, डिझेल व गॅसचे भाव दररोज वाढत चालले आहे. यामुळे गोरगरीब जनतेची आर्थिक कोंडी होत आहे. तसेच शहरी व ग्रामीण भागात भारनिमयन सुरु आहे. दोन दिवसांनी नवरात्र उत्सव सुरु होत असून, विद्यार्थ्यांच्या परिक्षाही सुरु होणार आहेत. तेव्हा भारनियमन बंद करावे पेट्रोल, डिझेल व गॅसचे भाव तात्काळ कमी करावे, तसेच विज भारनियमनही बंद करावे, अन्यथा शिवसेना आंदोलन छेडेल, असा इशारा खा.प्रतापराव जाधव, आ.संजय रायमुलकर यांचे मार्गदर्शनाखाली उपजिल्हाप्रमुख राजेंद्र गाडेकर, तालुका प्रमुख सुरेश वाळूकर, बाजार समिती सभापती माधवराव जाधव, पंचायत समिती सभापती जया खंडारे, युवासेना जिल्हा युवा अधिकारी ऋषी जाधव, उपतालुकाप्रमुख समाधान साबळे, शहरप्रमुख तथा उपनगराध्यक्ष जयचंद बाठीया, उपसभापती बबनराव तुपे, उपसभापती राजू घनवट, आरोग्य सभापती ओम सौभागे, खविसंचे उपाध्यक्ष विनोद देशमुख, शिक्षण सभापती रामेश्वर भिसे, संचालक केशवराव खुरद, नगरसेवक विकास जोशी, माधव तायडे, पिंटू सुर्जन, प्रकाश चौधरी, मनोज घोडे, निंबाजी पांडव, दिलीप बापू देशमुख, संजय ठाकूर, मारुती जुनघरे, प्रविण लहाने, अशोक पसरटे, माजी अध्यक्ष बबनराव भोसले, संदीप तट्टे, समाधान सास्ते, भास्कर घोडे, विकास आखाडे, माजी नगराध्यक्ष रामराव म्हस्के, कैलास खंडारे यांच्यासह शिवसेनेने दिला आहे.

Web Title: Demand for Shiv Sena Chief Minister against inflation and weightlifting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.