ग्रामीण भागातील बस सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:38 AM2021-08-12T04:38:42+5:302021-08-12T04:38:42+5:30

पूरग्रस्तांना धाड ग्रामस्थांनी दिली मदत धाड : काेकणात पुरामुळे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी धाड येथील ग्रामस्थांनी ...

Demand to start buses in rural areas | ग्रामीण भागातील बस सुरू करण्याची मागणी

ग्रामीण भागातील बस सुरू करण्याची मागणी

Next

पूरग्रस्तांना धाड ग्रामस्थांनी दिली मदत

धाड : काेकणात पुरामुळे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी धाड येथील ग्रामस्थांनी मदत पाठवली . निलेश गुजर पाटील, सागर महाराज भाेंडे यांनी ही मदत संकलित केली़

प्लास्टिक बंदी नावालाच

बुलडाणा : शहरात गत काही दिवसांपासून प्लास्टिकचा सर्रास वापर हाेत आहे़ नगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी हाेत आहे़

मोठे वाहन मुख्य रस्त्यावर येण्यास अडचणी

बुलडाणा : अमडापूरवरून साखरखेर्ड्याकडे जाताना अंडर ब्रिजमधून मोठे वाहन मुख्य रस्त्यावर येऊ शकत नाही. हीच परिस्थिती साखरखेर्ड्यावरून चिखलीकडे येताना मोठी वाहने वळण घेतानाही अडचणी आहेत.

पाकिटाद्वारे भेसळयुक्त दुधाची विक्री

बुलडाणा : शहरात पाकिटाद्वारे भेसळयुक्त दुधाची विक्री केली जात आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सध्या दुधाचा तुटवडा असल्याने नागरिक मिळेल त्या ठिकाणावरून दूध खरेदी करतात. दुधाच्या तपासणीकडे दुर्लक्ष होते.

विद्युत पुरवठ्याच्या समस्यांमध्ये वाढ

मेहकर : महावितरणच्या दुर्लक्षित कारभारामुळे परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. डोणगाव, लाणीगवळी परिसरात ओव्हरलोड वाढल्याने येथे वारंवार विद्युतपुरवठा खंडित होत आहे.

रस्त्याच्या कामाला निधीचा अभाव

देऊळगाव राजा : तालुक्यातील अनेक पांदण रस्त्यांवर शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. शेतमाल आणताना कसरत करावी लागत आहे. अतिक्रमण काढून पांदण रस्ते मोकळे करण्याची गरज आहे. निधीअभावी रस्त्यांची कामे रखडल्याचे दिसून येते.

वडगाव तेजन येथे हिवताप जनजागृती

सुलतानपूर : सुलतानपूर प्राथमिक आरोग्य केंद्र तथा उपकेंद्र वडगाव तेजन येथे हिवताप जनजागरण मोहीम सुरू करण्यात आली. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रल्हाद जायभाये यांनी डासामार्फत होणाऱ्या आजारांबाबत माहिती दिली.

पीक विम्याच्या लाभापासून शेतकरी वंचित !

राहेरी बु. : मागील वर्षी पिकांचे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला नाही. त्यामुळे यावर्षी पीकविमा काढण्याचे प्रमाण कमी आहे. याकडे लक्ष देऊन मागील वर्षी विमा काढलेल्या शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ देण्याची मागणी शेतकरी श्रीराम सरकटे यांनी मुख्यमंत्र्यांकडे ई-मेलद्वारे केली आहे.

मासरुळ परिसरात हळदीचे पीक बहरले

मासरुळ : परिसरातील शेतकऱ्यांनी माेठ्या प्रमाणात हळदीची लागवड केली आहे़ सध्या पाेषक वातावरण असल्याने माजी सरपंच शेषराव किसन सावळे यांच्या शेतातील हळदीचे पीक बहरले आहे़

७२ प्रकरणांमध्ये घडवला समझोता

बुलडाणा : लॉकडाऊन काळात संपूर्ण कुटुंबच घरामध्ये अडकल्याने दैनंदिन आयुष्याचे गणित बिघडले. जिल्ह्यात जानेवारी २०२१ ते मे २०२१ पर्यंत २०७ तक्रारी दाखल झाल्या आहेत़ त्यापैकी ७२ प्रकरणांमध्ये भराेसा सेलने समझोता घडवला आहे़

Web Title: Demand to start buses in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.