कोरोना रुग्णांची होणारी लूट थांबविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:35 AM2021-04-27T04:35:28+5:302021-04-27T04:35:28+5:30
कोरोना महामारीने संपूर्ण राज्यासह बुलडाणा जिल्हा आणि देऊळगावराजा तालुका होरपळून निघत आहे. दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत आहे. मृत्यूचे प्रमाणही ...
कोरोना महामारीने संपूर्ण राज्यासह बुलडाणा जिल्हा आणि देऊळगावराजा तालुका होरपळून निघत आहे. दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत आहे. मृत्यूचे प्रमाणही आता वाढले आहे. तालुक्यात ऑक्सिजन व रेमडेसिविरचा सर्वत्र तुटवडा पडला आहे. ही स्थिती संपूर्ण जिल्ह्यासह तालुक्याची आहे. रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होत आहे. याकडे प्रशासनाचा दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. काही ठिकाणी औषधांचा तुटवडा जाणवत आहे. कोरोना रुग्णांचे नातेवाईक आपले सोन्याचे दागिने मोडून औषधांचा जुगाड करत आहे. आज रुग्णालयात बेड मिळत नाही. त्यामुळे कोरोना रुग्णांना खाजगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे. परंतु काही रुग्णालयात रुग्णांना अव्वाच्या सव्वा बिल देत असल्याचे दिसून येते. आज रोजी शासकीय कोविड सेंटर आणि खासगी कोविड रुग्णालयात जेवढे रुग्ण भरती आहेत, किमान त्यांना आवश्यकतेनुसार इंजेक्शनचा पुरवठा करण्यात यावा, खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांची होणारी लूट थांबवावी या मागणीचे निवेदन भारतीय मानवाधिकार संघटनेच्यावतीने तहसीलदार, डॉक्टर असोसिएशन, मेडिकल असोसिएशनकडे देण्यात आले. निवेदन देतेवेळी प्रवीणकुमार काकडे, जाकेराबी शेख, संतोष कदम, जायभाये, पूजा कायंदे, अनिल मोरे आदी उपस्थित होते.