पाण्याचा अपव्यय थांबवण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:42 AM2021-07-07T04:42:25+5:302021-07-07T04:42:25+5:30
अंढेरा फाटा ते मेरा फाटा रस्त्याची दुरवस्था अंढेरा : मागील काही दिवसांपासून अंढेरा फाटा ते मेरा रस्त्यावर मोठमोठे खड्डे ...
अंढेरा फाटा ते मेरा फाटा रस्त्याची दुरवस्था
अंढेरा : मागील काही दिवसांपासून अंढेरा फाटा ते मेरा रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या कडा खचल्या आहेत. त्यामुळे या रस्त्याची अक्षरश: चाळणी झाली आहे. यावरही कळस म्हणजे रस्त्यावरील इंग्रजकालीन पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.
प्रधानमंत्री जीवनदायी योजनेचा लाभ द्या
सुलतानपूर : प्रधानमंत्री जीवनदायी योजनेचे सर्वेक्षण करून त्याचा गोरगरीब रुग्णांना लाभ द्यावा, अशी मागणी हाेत आहे. योजनेंतर्गत गरीब रुग्णांना पाच लाख रुपयांपर्यंत विमा दिला जातो. अनेक रुग्ण याेजनेपासून वंचित आहेत.
डाेणगाव परिसरात अवैध वृक्षतोड
डाेणगाव : परिसरात गत काही दिवसांपासून अवैध वृक्षताेड माेठ्या प्रमाणात वाढली आहे. महामार्गाच्या दाेन्ही बाजूला असलेली जुनी झाडे ताेडून त्यांची विल्हेवाट लावण्यात येत आहे. याकडे वन विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
स्वस्त धान्य दुकानात नियमांचे उल्लंघन
मेहकर : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्वस्त धान्य दुकानात नियमांचे उल्लंघन होत आहे. परिसरातील काही स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्याची जादा दराने विक्री करण्यात येते. लाभार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे रखडली
माेताळा : तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरुस्ती पावसामुळे रखडली आहे. ग्रामीण भागात गावांना जाेडणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत़. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे़
अंभाेडा येथे पुलाला मंजुरी
बुलडाणा : तालुक्यातील अंभाेडा येथील पुलाला मंजुरी मिळाली आहे़ जि. प. सदस्य ॲड. जयश्री शेळके यांनी मुंबई येथे सार्वजनिक बांधकाममंत्री ना. अशोकराव चव्हाण यांची भेट घेऊन पुलाला मंजुरी देण्याची मागणी केली हाेती़
सिलिंडर घरपाेच देणाऱ्यांना लस द्या
बुलडाणा : काेराेना संसर्गामुळे प्रशासनाने लावलेल्या निर्बंधांतही गॅस सिलिंडरचे घरपाेच वितरण सुरू आहे. मात्र, दुसरीकडे डिलिव्हरी बॉयला लसीकरणात प्राधान्य नसल्याने, कोरोना संसर्गाचा धोका नाकारता येत नाही. डिलिव्हरी बाॅयसह एजन्सीमधील कर्मचाऱ्यांनाही लस देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
कोरोना महामारीतही लाचखोरी सुरूच
बुलडाणा : काेराेनातही जिल्ह्यात लाचखाेरी सुरूच आहे़ बुलडाणा जिल्ह्यात २०२० या वर्षात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १४ सापळे यशस्वी केले आहेत, तर २०२१ या वर्षातील पाच महिन्यांत ९ लाचखोरांना गजाआड करण्यात आले आहे.
गोरेगाव ते उमनगाव रस्त्याची दुरवस्था
साखरखेर्डा : गोरेगाव ते उमनगाव रस्त्याची चाळणी झाली असून, मागील वर्षी अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या पुलाचे कामही रखडले आहे. पहिल्याच पावसात पुलाची वाट लागण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने याची दखल घेऊन काम तात्काळ सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्या
चिखली : तालुक्यातील उंद्री, अमडापूर व धोडप या मंडळात १६ व १८ जून रोजी झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाले असून, या नुकसानीचा तातडीने सर्व्हे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.
पशुखाद्याचे दर वाढले
बुलडाणा : काेराेनामुळे गत वर्षापासून प्रशासनाकडून निर्बंध लावण्यात येत आहेत. त्यामुळे पशुपालक आधीच संकटात आहेत. त्यातच पशूंचे खाद्य महागल्याने त्यांच्यावर आणखी एक संकट आले आहे.
शुद्ध पाण्याचा पुरवठा करा
माेताळा : शहरात गत काही दिवसांपासून पिवळसर पाण्याचा पुरवठा हाेत आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती करावी तसेच शहराला नळाद्वारे येत असलेल्या पाण्यामध्ये ब्लिचिंग तथा तुरटीचा वापर करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पावसाळ्यात साथीचे आजार पसरण्याची शक्यता असल्याने नगर पंचायतीने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.