बस फेरी पूर्ववत करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:34 AM2021-07-31T04:34:50+5:302021-07-31T04:34:50+5:30
काेराेनामुळे गत वर्षापासून शाळा बंदच आहेत. त्यामुळे मुलांना ऑनलाइन शिक्षण देण्यात येत असल्याने ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी विविध कारणांनी ...
काेराेनामुळे गत वर्षापासून शाळा बंदच आहेत. त्यामुळे मुलांना ऑनलाइन शिक्षण देण्यात येत असल्याने ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी विविध कारणांनी या शिक्षणापासून वंचित आहेत. काेराेनाची दुसरी लाट ओसरत असल्याने काेराेनामुक्त झालेल्या गावांमध्ये ग्रामपंचायतींनी प्रस्ताव दिल्यास शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. दुसरबीड काेराेनामुक्त असल्याने येथील शाळा सुरू झाल्या आहेत. दुसरबीड परिसरातील अनेक विद्यार्थी दरराेज शाळेत येत आहेत. शाळा सुरू झाल्या असल्या तरी अजूनही परिसरात पूर्वी सुरू असलेल्या बसफेऱ्या सुरू करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे, विद्यार्थ्यांची पायपीट हाेत आहे. तसेच खासगी वाहनांनी धाेकादायक प्रवास करून विद्यार्थी शाळेत येत आहेत. ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षण कुचकामी ठरल्याने शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे दुसरबीड ते देऊळगाव मही, दुसरबीड ते लिंगदेवखेड, केशव शिवनी आदी बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी परिसरातील पालकांनी केली आहे़