'वंचित'चे तहसील समोर धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:39 AM2021-07-14T04:39:53+5:302021-07-14T04:39:53+5:30
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष नीलेश जाधव यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यामध्ये खामगाव तालुक्यातील चितोडा येथे दोन कुटुंबांमध्ये ...
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष नीलेश जाधव यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यामध्ये खामगाव तालुक्यातील चितोडा येथे दोन कुटुंबांमध्ये वैयक्तिक कारणावरून वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यामध्ये आमदार संजय गायकवाड आपल्या समर्थकांसह चितोडा गावामध्ये प्रवेश करून अनुसूचित जातींच्या लोकांवर दबाब व दहशत निर्माण करण्याच्या हेतूने धमकीवजा भाषणबाजी केली, असा आरोप निवेदनात करण्यात आला असून आ. गायकवाड यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्ट व इतर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात यावे व त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अस्त्र-शस्त्र पुरविणे या विधानाची चौकशी करून उच्चस्तरीय समिती नेमण्याची मागणी देखील करण्यात आली. आंदोलनात उपाध्यक्ष अशोकसिंह राजपूत, तालुकाध्यक्ष संजय धुरंधर, अॅड. अमर इंगळे, शंकर मलवार यांच्यासह वंचितचे बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आंदोलनात महिलांचाही सहभाग
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष नीलेश जाधव यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयासमोर करण्यात आलेल्या या धरणे आंदोलनात घोषणाबाजी करण्यात आली. यामध्ये महिलाही बहुसंख्येने सहभागी झाल्या होत्या.