कृषी दुतांनी दिले माती परिक्षणाचे प्रात्यक्षिक
By Admin | Published: June 26, 2017 01:12 PM2017-06-26T13:12:03+5:302017-06-26T13:13:01+5:30
कृषी दुतांनी तालुक्यातील निमखेड येथील शेतकºयांनामाती परिक्षणाचे प्रात्यक्षिक करुन दाखवित माती परिक्षणाचे महत्वशेतकºयांना पटवून दिले.
देऊळगावराजा : येथील समर्थ कृषी महाविद्यालयातील ग्रामीण कृषी
कार्यानुभवाअंतर्गत कृषी दुतांनी तालुक्यातील निमखेड येथील शेतकऱ्यांना
माती परिक्षणाचे प्रात्यक्षिक करुन दाखवित माती परिक्षणाचे महत्व
शेतकऱ्यांना पटवून दिले.
यावेळी मातीचा नमुना कसा घ्यावा, किती प्रमाणात घ्यावा व नंतर तो
प्रयोगशाळेत कसा पाठवावा याबद्दल शेतकऱ्यांना कृषीदुतांनी सविस्तर
मार्गदर्शन केले. तसेच नमुना तपासून आल्यानंतर कोणते घटक व रासायनिक खत
किती प्रमाणात वापरावे याबाबत माहिती दिली. यावेळी विठ्ठल कव्हळे, नरसिंग
कव्हळे, श्रीराम कव्हळे, संजय कव्हळे, दीपक कव्हळे, बबनराव कव्हळे, अंकूश
कव्हळे, सुदाम कव्हळे तसेच कृषी दुत हरिदास मुंढे, उमेश पाचपोर, मोहनदास
मुंढे, भरत नागरे, विवेक नालिंदे, दत्ता पालवे, अरुण पांढरे, पी.चरित आदी
कृषी दूत उपस्थित होते. या प्रात्यक्षिकासह महाविद्यालयाचे प्राचार्य
नितीन मेहेत्रे, रासेयो समन्वयक प्रा.मोहनजितसिंग राजपूत व प्रा.विलास
सातपुते यांचे मार्गदर्शन लाभले.
(तालुका प्रतिनिधी)