कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:24 AM2021-06-26T04:24:38+5:302021-06-26T04:24:38+5:30
बुलडाणा : मागासवर्गीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदाेन्नती देण्याच्या मागणीसाठी २५ जून राेजी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, बुलडाणाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर निदर्शने करण्यात ...
बुलडाणा : मागासवर्गीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदाेन्नती देण्याच्या मागणीसाठी २५ जून राेजी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, बुलडाणाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर निदर्शने करण्यात आली आहे़ त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष ॲड. कृष्णा इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्हाभर तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. ७ मे २०२१ चा महाराष्ट्र शासनाचा पदोन्नतीमधील आरक्षणाला स्थगित देणारा अध्यादेश रद्द करण्यात येऊन पूर्वीप्रमाणचे पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली़ तसेच निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. आंदाेलनात कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे
पदाधिकारी बि. डी. धुरंधर, दिलीप खिल्लारे, एन. डी. इंगळे, सुभाष डोंगरदिवे, आय. टी. इंगळे, प्रशांत
बोड, अशोक हिवाळे, गाेविंदा वाघ, अशोक दाभाडे, सुनील इंगळेे, शेषराव वाकोडे, संदीप वानखेडे आदींनी सहभाग घेतला़. मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदाेलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे़
विविध संघटनांचा आंदाेलनाचा पाठिंबा
या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य पदवीधर शिक्षक व
केंद्रप्रमुख संघटना, महाराष्ट्र राज्य जुने हक्क वा पेन्शन संघटना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती,
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद, महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय उर्दु
संघटना, महाराष्ट्र राज्य उर्दु शिक्षक संघटना, संघटनानी पाठिंबा दिला आहे़