डेंग्यू निर्मूलन जनजागरण रॅली
By admin | Published: November 16, 2014 12:05 AM2014-11-16T00:05:12+5:302014-11-16T00:05:12+5:30
बुलडाणा जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून स्वच्छतेचे अवाहन, प्रतिबंधात्मक उपाययोजनेस प्राधान्य.
बुलडाणा : राज्यात सर्वत्र डेंग्यूचा वाढता प्रभाव पाहता त्याला आळा घालण्यासाठी शासनस्तरावरुन विविध उपाययोजना अमलात आणण्यात येत आहेत. डेंग्यूवर निश्चित औषधोपचार नसल्यामुळे तूर्तास प्रतिबंधात्मक उ पाययोजना हाच एकमेव उपाय असल्यामुळे राज्यात सर्वत्र १४ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत स्वच्छता अभियान घेण्यात येणार आहे. या अभियानाच्या अनुषंगाने शहरात डेंयू, स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीकरिता जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक हिवाळे, डॉ.कुटुंबे, जिल्हा हिवताप अधिकारी वानखेडे, अवैद्यकीय आरोग्य अधिकारी जाधव, श्रीमती बोरीकर तसेच सामान्य रुग्णालय बुलडाणा येथील नर्सिंंगच्या विद्यार्थिनी, एडेड शाळा, भारत विद्यालय व प्रबोधन शाळेचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
रॅलीला मार्गदर्शन करताना डॉ.हिवाळे यांनी डेंग्यूवर औषधोपचार नसल्यामुळे त्याला रोखण्यासाठी केवळ प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्त्वाची असून, त्याची माहिती जनतेपर्यंंत पोहोचविणे अत्यंत महत्त्वाचे आहे; तसेच अशा प्रकारच्या रॅली काढून सहज संदेश जनतेपर्यंत पोहोचविल्या जाऊ शकतो, असे प्रतिपादन केले.