डेंग्यूसदृश तापाने चिमुकल्याचा मृत्यू
By admin | Published: October 2, 2014 11:56 PM2014-10-02T23:56:30+5:302014-10-02T23:56:30+5:30
लोणार तालुक्यातील उद्नापूर येथील एका ६ वर्षीय चिमुकल्याचा डेंग्यूसदृश तापाने मृत्यू
कोयाळी दहातोंडे (लोणार, जि. बुलडाणा) : लोणार तालुक्यातील उद्नापूर येथील एका ६ वर्षीय चिमुकल्याचा डेंग्यूसदृश ता पाने मृत्यू झाल्याची घटना २ ऑक्टोबर रोजी सकाळी घडली.
यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, गत काही दिवसांपासून कोयाळी दहातोंडे व उद्नापूर येथे मलेरिया, डेंग्यू, सर्दी, ताप, खोकला यासारख्या साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. उद्नापूर ये थील ऋषिकेश सुरेश मुळे (६) याला ताप आल्यामुळे त्याला मेहकर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले; परंतु प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याला पुढील उपचारार्थ औरंगाबाद येथे हलविण्यात आले. उपचारादरम्यान ऋषिकेश मुळेचा मृत्यू झाला. त्याचा डेंग्यूसदृश तापाने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच कोयाळी व उद्नापूर येथील अनेक रुग्ण तापाने फणफणत आहेत. येथील रुग्णांवर मेहकर, वाशिम, औरंगाबाद येथे उपचार सुरू आहेत. परिसरात सुरू असलेल्या डेंग्यूसदृश तापेच्या साथीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, याकडे आरोग्य विभागाचे मात्र दुर्लक्ष दिसून येत आहे. येथे आरोग्य सेवक नसल्यामुळे गावात शासकीय औषधी व आरोग्य सुविधा मिळत नाहीत. गावातील नाल्या जमीनदोस्त झाल्या असून, ग्रा. पं. प्रशासनही याकडे दुर्लक्ष करीत आहे. सांडपाण्याचे व्यवस्थापन नसल्याने मच्छरांचा वावर वाढला आहे. पिण्याच्या पाण्यामध्येही ब्लिचिंग पावडर टाकल्या जात नाही. तसेच आरोग्य विभागाकडून पाण्याचे नमुने तपासल्या जात नसल्याने कोयाळी व उद्नापूर येथे मलेरिया, डायरियासारख्या रोगाचे सत्र सुरूच आहे. कोयाळी-उद्नापूर येथे सद्य:स्थितीत आरोग्य विभागाने विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी उद्नापूर येथील देविदास मुळे यांच्यासह ग्रामस्थांमधून होत आहे.