अंत्री खेडेकर गावात डेंग्यूसदृश तापाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:05 AM2021-02-06T05:05:33+5:302021-02-06T05:05:33+5:30

अंत्री खेडेकर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या केंद्रांतर्गत चार ते पाच वैद्यकीय अधिकारी काम करतात. परंतु या गावांमध्ये ...

Dengue-like fever spread in Antri Khedekar village | अंत्री खेडेकर गावात डेंग्यूसदृश तापाची लागण

अंत्री खेडेकर गावात डेंग्यूसदृश तापाची लागण

Next

अंत्री खेडेकर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या केंद्रांतर्गत चार ते पाच वैद्यकीय अधिकारी काम करतात. परंतु या गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून विविध आजार बळावले असल्याने अनेकजण ताप, खोकला, सर्दी आजाराने त्रस्त आहेत. त्यामध्ये गावातील दाेन मुलांना ताप आल्याने उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. उपचार सुरू असताना त्या दोन्ही मुलांना डेंग्यूसदृश ताप असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. त्यामुळे गावात आणखी डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण वाढू नये यासाठी आरोग्य विभागाने खबरदारी घेत उपाययोजना करणे गरजेचे आहे. तरी वरिष्ठ अधिकारीवर्गाने तात्काळ दखल घेऊन गावात आजारी रुग्णांवर औषध उपचार करावा, अशी मागणी होत आहे. अंत्री खेडेकर येथे डेंग्यूसदृश तापाचे दोन रुग्ण आढळून आल्याने ग्रामपंचायतीकडूनही प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.

कोट

ग्रामपंचायतीच्या वतीने गावात तात्काळ फाॅगिंग करण्यात आली आहे. दोन पथकेसुद्धा कार्यान्वित करण्यात आली आहेत. योग्य ते पाऊल आरोग्य विभागाच्या वतीने उचलण्यात येतील. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, काळजी घ्यावी.

डाॅ. विनोद वायाळ, वैद्यकीय अधिकारी आरोग्य केंद्र, अंत्री खेडेकर.

Web Title: Dengue-like fever spread in Antri Khedekar village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.